विशेष प्रतिनिधी
दिल्ली : सुप्रीम कोर्टाने बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची याचिका फेटाळली आहे. पराभव झाला तर ईव्हीएममध्ये बिघाड आणि निवडणूक जिंकली तर ते यश असं कसं होऊ शकतं? असा बोचरा सवाल सुप्रीम कोर्टाने केला आहे.
महाविकास आघाडीचे नेते या निकालावर संशय निर्माण करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यासाठी वकिलांची टीम गठीत करण्याची घोषणा केली आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ईव्हीएम विरोधात एल्गार पुकारण्याचे आव्हान केले आहे. महाविकास आघाडीकडून ईव्हीएममध्ये घोळ करण्यात आल्याने आपल्या सर्वाधिक उमेदवारांचा पराभव झाला, असा दावा केला जातोय. याच दाव्यासह महाविकास आघाडीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण सुप्रीम कोर्टाने ती याचिका फेटाळली आहे. महाविकास आघाडीने बॅलेट पेपवर निवडणूक घेण्याची मागणी याचिकेत केली होती. ती याचिका कोर्टाने फेटाळली आहे.
सुप्रीम कोर्टाने बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची याचिका फेटाळली आहे. पराभव झाला तर ईव्हीएममध्ये बिघाड आणि निवडणूक जिंकली तर ते यश असं कसं होऊ शकतं? असा सवाल सुप्रीम कोर्टाने केला आहे. मतदारांना प्रलोभन दाखवताना पैसे, दारू किंवा अन्य वस्तूंचे वाटप केल्यास उमेदवाराला पाच वर्ष निवडणूक लढवण्यावर बंदी असेल, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.




















