विशेष प्रतिनिधी
सातारा: , महायुती म्हणून आपले दोन इतर सहकारी पक्ष आपल्याबरोबर आहेत आणि त्यांचा सन्मान राखला जाईल. मात्र शिवसेनेला कुठेही कमी लेखलं जाईल, तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा साताऱ्याचे पालकमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी दिला आहे. शिवसैनिकांचा कुठेही अपमान होणार नाही, आणि जर झाला, तर जशास तसे उत्तर दिलं जाईल, असेही ते म्हणाले. Shambhuraj Desai
निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यात सर्वच पक्षांमध्ये उमेदवारीची चाचपणी, दौरे आणि रणनीती बैठकींना वेग आला आहे. न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पूर्वी निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यामुळे, स्थानिक पातळीवरील राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र राहणार का? कोणत्या पक्षाला काय मिळणार? असे प्रश्न आहेत. अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या करकर्त्यांत अस्वस्थता आहे. Shambhuraj Desai
भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून योग्य मान दिला जात नाही. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना देसाई म्हणाले, आपण शांततेच्या मार्गाने काम करत राहायचं, पण अन्याय सहन करायचा नाही. त्यांनी कार्यकर्त्यांना संघटित राहण्याचं आणि आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेचा झेंडा उंचावायचा आहे.
फलटण शहरातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरही शंभूराज देसाई यांनी भाष्य केलं. या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने तपास सुरू केला आहे. या SIT च्या प्रमुख आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते या स्वतः फलटणमध्ये दाखल झाल्या असून, त्यांनी प्रकरणाची प्रत्यक्ष तपासणी सुरू केली आहे. या प्रकरणात दोषी कोणताही व्यक्ती असो, त्याला वाचवले जाणार नाही. प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक व्यक्तीची तपासणी पारदर्शक पद्धतीने होईल, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले.
Will Not Stay Silent if Shiv Sena is Undermined, Warns Shambhuraj Desai
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















