ते चार दिवस हे आपल्या प्रत्येकीसाठी तितकेच महत्त्वाचे आणि काहीसे आव्हानात्मक असतात. या काळात शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळ्यांवर आपल्याला लढावं लागतं हे सगळं जरी होतं असलं तरी मासिक पाळी दरम्यान सगळ्याचं महिलांना खरंच रजेची गरज आहे का ? त्या काळात त्यांना नेमका काय त्रास होतो? कामावर असताना कुठल्या समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं. आणि त्यासाठी संबंधितांनी काय करावं या सगळ्या प्रश्नानावर स्त्री रोग तज्ञ सारिका दहीफळे या काय म्हणाल्या ते बघा!