विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली लढत असलेल्या एनडीएने माेठ्या बहुमताच्या दिशेने आगेकूच केली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये १५२ जागांवर राष्ट्रीय लाेकशाही आघाडी (एनडीए) आघाडीवर आहे. Bihar Vidhansabha Election Result 2025
बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या कलांवरून नितीश कुमार यांचे सरकार पुन्हा निवडून येणार असल्याचे दिसून येते. महाआघाडी ७९ जागांवर आघाडीवर आहे. प्रशांत किशोर यांचा पक्ष, जनसूरज ट्रेंडमध्ये कोणत्याही जागेवर आघाडीवर नाही. अपक्षांसह इतर ११ जागांवर आघाडीवर आहेत.
तेजस्वी यादव राघोपूरमध्ये एनडीएचे उमेदवार सतीश यादव यांच्या पुढे आहेत. त्यांचे मोठे भाऊ तेजप्रताप मात्र महुआमध्ये पिछाडीवर आहेत. सम्राट चौधरी तारापूरमध्ये आघाडीवर आहेत.
बिहार निवडणुका दोन टप्प्यात झाल्या आणि ६७.१०% मतदान झाले. ही विक्रमी मतदानाची टक्केवारी होती, जी २०२० च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा जवळपास १०% जास्त होती.
तारापूरमध्ये भाजपचे सम्राट चौधरी आघाडीवर आहेत. लखीसरायमध्ये भाजपचे विजय सिन्हा आघाडीवर आहेत. राघोपूरमध्ये तेजस्वी यादव आघाडीवर आहेत. छपरामध्ये आरजेडीचे खेसारी लाल आघाडीवर आहेत.
दानापूरमध्ये आरजेडीचे रीतलाल यादव आघाडीवर आहेत. बाहुबलीची मुलगी आणि आरजेडी उमेदवार शिवानी लालगंजमध्ये आघाडीवर आहे. मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचे थाेरले चिरंजीव तेजप्रताप महुआमध्ये पिछाडीवर आहेत. बेलागंजमध्ये जेडीयूच्या मनोरमा देवी आघाडीवर आहेत.
Bihar Vidhansabha Election Result 2025
महत्वाच्या बातम्या
- District Collector : निवडणूक प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंध, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
- Shiv Sena, : शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणी पुढील वर्षी जानेवारीमध्ये
- कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र, ड्रग प्रकरणातील आरोपींच्या भाजप प्रवेशावरून नाना पटोले यांचा सवाल
- काेरेगाव पार्क जमीन प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा, अंजली दमानिया यांची मागणी



















