Vijaya Rahatkar : महिला – मुलींवर अत्याचार करणाऱ्या विकृतांना ताबडतोब सजा देण्यासाठी NCW वेगात काम करेल!!

Vijaya Rahatkar : महिला – मुलींवर अत्याचार करणाऱ्या विकृतांना ताबडतोब सजा देण्यासाठी NCW वेगात काम करेल!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात महिला आणि मुलींवरच्या अत्याचाराच्या घटना प्रचंड संताप आणणाऱ्या आहेत. अत्याचार करणाऱ्या विकृतांना ताबडतोब सजा देण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग वेगाने काम करेल, अशी ग्वाही राष्ट्रीय महिला आयोगाच्या नूतन अध्यक्ष विजया किशोर रहाटकर यांनी दिली. Newly appointed NCW Chief Vijaya Rahatkar takes charge

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर विजया रहाटकर यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर आज त्यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या मुख्यालयात येऊन पदभार स्वीकारला. त्यावेळी बोलताना त्यांनी महिला आणि मुलींवरच्या अत्याचारांबद्दल राष्ट्रीय महिला आयोग करीत असलेल्या कामाची माहिती दिली.


Prashant Kishor : प्रशांत किशोर यांच्याकडून झाली मोठी चूक! ‘या’ जागेवर आता उमेदवार बदलावा लागणार


विजया रहाटकर म्हणाल्या :

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय महिला आयोगाचे अत्यंत महत्त्वाची जबाबदारी माझ्यावर सोपवली त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. राष्ट्रीय महिला आयोग महिला आणि मुलींच्या प्रगतीसाठी सातत्याने काम करत आला आहे ते काम अधिक वेगात करण्याच्या दृष्टीने निश्चित पावले उचलण्यात येतील.

महिला आयोगाने आत्तापर्यंत अनेक चांगली कामे केली. आयोगाच्या पूर्वाध्यक्षांनी देखील कार्यक्षमतेने काम सांभाळले, पण महिला आयोगाची अनेक कामे जनतेसमोर येत नाहीत. आयोगातल्या सगळ्या सिस्टीम ऍक्टिव्हेट करून ही कामे जनतेसमोर आणण्याचे काम केले जाईल.

कोलकत्ता सारखी महिला अत्याचाराची घटना अत्यंत संताप निर्माण करणारीच आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने सुरुवातीलाच तिची दखल घेऊन कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. महिला आणि मुलींवर अत्याचार करणाऱ्या विकृतांना लवकरात लवकर सजा देण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग वेगात काम करेलच, त्याचबरोबर असे विक्रृत अत्याचार करायला धजावणारच नाहीत, अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी महिला आयोग भर देईल.

Newly appointed NCW Chief Vijaya Rahatkar takes charge

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023