‘महाकुंभ फालतू’ नातवंडांसोबत हॅलोवीन साजरा, लालूप्रसाद यादवांवर भाजपचा हल्लाबोल

‘महाकुंभ फालतू’ नातवंडांसोबत हॅलोवीन साजरा, लालूप्रसाद यादवांवर भाजपचा हल्लाबोल

Lalu Prasad Yadav

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. काही महिन्यांपूर्वी महाकुंभला ‘फालतू’ (अर्थहीन) असे वक्तव्य करून धार्मिक भावनांना धक्का दिल्यानंतर, आता त्यांचा नातवंडांसोबत ‘हॅलोवीन’ सण साजरा करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने लालू यादवांवर जोरदार हल्ला चढवला आहे.

भाजप किसान मोर्चाच्या (BJPKM) अधिकृत ‘X’ हँडलवरून पोस्ट करत म्हटले आहे, “बिहारच्या जनतेने विसरू नये, हे तेच लालू यादव आहेत ज्यांनी महा कुंभसारख्या श्रद्धा आणि अध्यात्माच्या सोहळ्याला ‘फालतू’ म्हटले होते. आता ते परदेशी सण हॅलोवीन साजरा करत आहेत. जे श्रद्धा आणि संस्कृतीवर आघात करतात, त्यांना बिहारची जनता मतांनी उत्तर देईल.”

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये लालू प्रसाद यादव आपल्या नातवंडांसोबत हॅलोवीन साजरा करताना, फोटो काढताना आणि हसताना दिसत आहेत.त्यांची मुलगी आणि आरजेडी नेत्या रोहिणी आचार्य यांनी या क्षणांचे काही व्हिडिओ आणि फोटो ‘X’ (माजी ट्विटर) वर पोस्ट करत लिहिले,

“Happy Halloween to everyone.”

या पोस्टनंतर भाजप आणि आरजेडी समर्थकांमध्ये सोशल मीडियावर तीव्र वाद रंगला आहे.

लालू प्रसाद यादव यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये दिलेल्या एका वक्तव्यात महा कुंभ मेळाव्याला “फालतू” (meaningless) म्हटले होते. त्यावेळी दिल्ली रेल्वे स्थानकावर कुंभ यात्रेकरूंच्या गर्दीत झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला होता. त्या वेळी पत्रकारांनी लालू यादवांना विचारले होते की कुंभ यात्रेकरूंच्या व्यवस्थापनाबाबत त्यांचे मत काय आहे, यावर त्यांनी म्हणाले होते,“कुंभचा काय अर्थ आहे? फालतू आहे कुंभ.”या वक्तव्यामुळे भाजप आणि हिंदू संघटनांनी त्यांच्यावर ‘धार्मिक भावना दुखावल्याचा’ आरोप करत निषेध नोंदवला होता.

भाजप नेते म्हणतात की, “लालू यादव हे धर्म आणि अध्यात्माची थट्टा करणारे नेते आहेत. महाकुंभसारखा जागतिक धार्मिक सोहळा ते ‘फालतू’ म्हणतात, पण परदेशी संस्कृतीतील सण साजरे करतात. बिहारच्या जनतेने हे पाहावे.”

आरजेडी समर्थकांनी प्रत्युत्तर दिले की, “हॅलोवीन हा केवळ कौटुंबिक सण म्हणून साजरा करण्यात आला, त्यात काही चुकीचे नाही.”

Now Celebrates Halloween with Grandkids’: BJP Slams Lalu Prasad Yadav

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023