विशेष प्रतिनिधी
पाटणा : अवघ्या २५ वर्षांच्या असलेल्या मैथिली ठाकूर बिहारच्या सर्वात तरुण आमदार ठरल्या आहेत. अलीनगर मतदारसंघातून (१२०००) माेठ्या मताधिक्याने विजयी. Maithili Thakur
मैथिली सुप्रसिद्ध गायिका असून भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या दुसऱ्याच दिवशी पक्षाने तिला उमेदवारी दिली. त्यासाठी विद्यमान आमदार मिश्रीलाल यादव यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यानंतर त्यांनी भाजपमधून राजीनामा दिला हाेता.
मैथिली ठाकूर ही प्रसिद्ध गायिका आहे. 25 जुलै 2000 रोजी जन्म झालेली मैथिली मूळची बिहारमधील मधुबनी येथील आहे. पण गेल्या काही काळापासून दिल्लीतील नजफगड येथे राहते. मैथिली ठाकूरचे वडील रमेश ठाकूर संगीतकार असून तिचे संगितातील गुरू देखील आहेत. मैथिली ठाकूरला ऋषभ ठाकूर आणि अयाची ठाकूर असे दोन भाऊ आहेत. मैथिलीला संगीताचा वारसा तिच्या आजी- आजाेबांकडून मिळाला आहे.
मैथिलीने लहानपणापासूनच संगीताचे शिक्षण घेण्यास सुरूवात केली. त्यामुळे शाळेतही गेली नाही. पाचवीपर्यंत घरातच अभ्यास केला. मात्र, तिचे संगीतातील टॅलेंट पाहून बाल भवन इंटरनेशनल स्कूलने स्कॉलरशिप दिली.
द राइजिंग स्टार शोमुळे मैथिली खऱ्या अर्थाने प्रसिध्दीच्या झाेतात आली. 2017 मध्ये रियलिटी शो द राइजिंग स्टार मध्ये निवड झाली तेव्हा ती अकरावीत हाेती. या शाेमध्ये तिला दुसरा क्रमांक मिळाला. त्यानंतर मैथिलीने साेशल मिडीयावर सुरूवात केली.
फेसबुक, यूट्यूब पर अकाउंट बनवून स्वत:चे व्हिडिओ टाकायला सुरूवात केली. त्यासाठी एडिटिंग, कंपोजींगही शिकले. त्यानंतर साेशल मीडिया स्टार म्हणून मैथिली पुढे आली. तिचे देशात आणि परदेशातही शाे हाेऊ लागले. मात्र, मैथिलीने कधीही चित्रपटांमध्ये गाणे गायले नाही. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूमुळे आपण कधीही चित्रपटसृष्टीत जायचे नाही असा निर्णय घेतल्याचे मैथिली म्हणते.
Who is the youngest MLA of Bihar, Maithili Thakur?
महत्वाच्या बातम्या
- District Collector : निवडणूक प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंध, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
- Shiv Sena, : शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणी पुढील वर्षी जानेवारीमध्ये
- कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र, ड्रग प्रकरणातील आरोपींच्या भाजप प्रवेशावरून नाना पटोले यांचा सवाल
- काेरेगाव पार्क जमीन प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा, अंजली दमानिया यांची मागणी



















