Supriya Sule : तुळजापूर ड्रग प्रकरणातील आराेपीचा भाजप प्रवेश, सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तक्रार

Supriya Sule : तुळजापूर ड्रग प्रकरणातील आराेपीचा भाजप प्रवेश, सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तक्रार

Supriya Sule

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Supriya Sule तुळजापूर ड्रग्स प्रकरणात जामिनावर बाहेर असलेला आरोपी आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वरने भाजपमध्ये प्रवेश केल्यावरून वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित चिंता व्यक्त केली.



सुळे (Supriya Sule) यांनी पत्रात लिहिले आहे की, “ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळत आहे, हे अत्यंत चिंताजनक आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना राजकीय पक्षात स्थान देणे म्हणजे समाजविघातक प्रवृत्तींना प्रोत्साहन देणे होय. लोकशाही व्यवस्थेत पक्ष वाढवण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, पण गुन्हेगारांना आसरा देणे ही जबाबदार राजकारणाची पद्धत नाही.”

http://youtube.com/post/Ugkxll6v40BZvj2_GTUWUS518vv0ih7mNvBc?si=DH2N8G4lD9lW32yV

ग्जविरोधी मोहिमेचे महत्त्व अधोरेखित करत सरकारने यावर ठोस भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करत सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रात ड्रग्ज तस्करीला राजाश्रय दिला जाणार नाही, असा संदेश सरकारकडून गेला पाहिजे, आपण राज्याचे प्रमुख आहात, आपल्यासमोर अनेक कामे पडलेली असतात. त्यामुळे कदाचित ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचली नसावी, किंवा सदर व्यक्तीच्या ड्रग्स गुन्हेगारीमधील पार्श्वभूमीबाबत आपल्याला माहिती देण्यात आली नसावी. हे गृहित धरुन मी आपणास हे पत्र लिहित आहे. समाजहित डोळ्यासमोर ठेवून ड्रग्जविरोधी लढ्यात आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत. या संदर्भात मी यापूर्वीही आपणांस पत्राद्वारे कळविले होते.

तुळजापूरमधील या प्रकाराकडे आपण गांभीर्याने लक्ष घालून संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई कराल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. ड्रग्स तस्करीला या महाराष्ट्रात राजाश्रय दिला जाणार नाही अशा प्रकारचा सकारात्मक संदेश समाजात जाण्यासाठी आणि ड्रग्जविरोधी मोहिमेला बळकटी मिळावी यासाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. याची आपण योग्य ती दखल अवश्य घ्याल की अपेक्षा आहे, असे सुळे यांनी म्हटले आहे.

Accused in Tuljapur drug case joins BJP, Supriya Sule writes to Chief Minister on drug smuggling

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023