विशेष प्रतिनिधी
मुंबई : लाडकी बहीण योजनेबाबत गैरसमज निर्माण होत आहेत. आम्ही कोणाकडूनही पैसे माघारी घेत नाहीत. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर महिलांकडून आम्ही योजनेत पात्र नसल्याने पैसे परत देण्याबाबत अर्ज देत आहेत, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
लाडकी बहीण योजनेत ज्या महिला पात्र नाहीत त्यांच्याकडून पैशांची वसुली केली जाणार असल्याची चर्चा आहे. यावर स्पष्टीकरण देताना तटकरे यांनी कोणाकडूनही पैसे परत घेण्याचा विचार नाही असे सांगितले. त्या म्हणाल्या.
लग्न करुन परदेशी जाणे, चार चाकी वाहन, सरकारी नोकरी लागणे अशा गोष्टी घडल्या आहेत. लाडक्या बहीणींचा लाभ आम्ही माघारी घेतला नाही. महिला स्वत हून पैसे देत आहेत. जानेवारीचा हप्ता हा २६ जानेवारी पर्यंत दिला जाणार आहे.
जो संभ्रम निर्माण झालाय त्याला बळी पडू नका. लाडकी बहीण ही एकमेव योजना नाही की त्यांची पडताळणी होत असते. सगळ्या योजनांमध्ये ही प्रक्रिया असते. या योजनेचा हे पहिल वर्ष आहे
स्वतः महिला लाभ माघारी देत आहेत असे सांगून तटकरे म्हणाल्या, हे प्रमाण रोज ५ ते १० आहेत. साधारण एकूण ३.५० ते ४.५० हजार एवढे अर्ज आले असावेत.
रायगड जिल्हा पालकमंत्री पदावरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार भारत गोगावले यांनी केलेल्या टीकेवर तटकरे म्हणाल्या, हे वक्तव्य आश्चर्यकारक आहे. मला निवडून आणण्यात महायुतीच्या सगळ्यांनी काम केलं
सगळ्यांनी काम केलं त्याशिवाय बहुमत मिळाल असतं का ? महायुतीत नाव खराब होणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. आम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे. यात घराणेशाहीचा विषय काय ? इच्छा व्यक्त करण्यात काही गैर नाही. पण ही पद्धत योग्य आहे का ?आमच्या लोकांना देखील पद मिळाल नाही. नाशिक आणि कोल्हापूर जिल्हात बघा काय झाल. नेत्यांनी घेतलेला संयुक्तीत निर्णय सगळ्यांनी मान्य केला पाहिजे.
संसार चालू असताना अशा गोष्टी होतात. मागच्या २ वर्षात उदय सामंत हे पालकमंत्री होते. तेव्हा आम्ही चांगलं काम केलं. कोकणाला पहिल्यांदा ५ मंत्री मिळाले आहेत. विरोधक टिका करतातच. १५०० आम्ही देत होतो. त्यावेळी हे लोक तिजोरी रिकामी होईल म्हटले होते.
ज्या ज्या गोष्टी जाहीरनाम्यात लिहिल्या आहेत ते पूर्ण करू. मुख्यमंत्री यांनी सांगितले होते. हा जाहीरनामा आहे तो पाच वर्षासाठी आहे. कोणतेही आश्वासन खाली पडू देणार नाही, असेही तटकरे म्हणाल्या.
Aditi Tatkare clarified that the benefits of Ladki Bahin will not be taken back
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : एकनाथ शिंदे आणि माझे संबंध राजकारणाच्या पलीकडचे, वाद लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उदय सामंत यांनी सुनावले
- Prime Minister : पंतप्रधानांची ‘मन की बात’, वाशीमचे ‘स्टार्ट अप’चे केंद्र म्हणून कौतुक
- Gulabrao Patil : झोपेत असाल त्यावेळी ठाकरे गटाचे १० आमदार कधीही इकडे येतील, गुलाबराव पाटील यांचा आदित्य ठाकरे यांना इशारा
- Rohit Pawar : रोहित पवार यांना प्रदेशाध्यक्ष पदाचे डोहाळे, म्हणाले शरद पवार भाकरी फिरविणार