विशेष प्रतिनिधी
पंढरपूर : Eknath Shinde सध्या हवामान बदलामुळे राज्यात अनियमित पर्जन्यमान होत असल्याचे नमूद करत, मेपासून नोव्हेंबरपर्यंत पडलेला पाऊस ही निसर्गातील गंभीर असंतुलनाची लक्षणे आहे. त्यामुळे विकासाचे वारकरी व्हा, विनाशाचे मारेकरी नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले.
कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सहकुटूंब पूजा केली. पंढरपूर विठ्ठल रकुमाईच्या दर्शनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यावरण रक्षणाचा संकल्प करत आवाहन केलं आहे. कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी’ या उपक्रमाचा समारोप सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला.
पर्यावरण संवर्धन हा वारकरी परंपरेचा आत्मा असून प्रत्येक नागरिकाने झाडे लावणे, वाढवणे आणि जपणे ही जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन करताना शिंदे म्हणाले, “वारीत लाखो वारकरी सहभागी होतात, त्यामुळे या वारीतूनच समाजाला निसर्ग रक्षणाचा संदेश द्यावा, असे आवाहन करत त्यांनी राज्यात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड, नद्यांचे प्रदूषण निर्मूलन, जलसंधारण, बीच क्लिनिंग आणि डीप क्लिन ड्राईव्ह या उपक्रमांना गती देण्यात येणार आहे. राज्यात 1 लाख हेक्टरवर बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून ग्रामीण व शहरी भागात अर्बन फॉरेस्ट मॉडेल उभारले जाणार आहे. मुलांपासून पर्यावरण शिक्षणाची कास धरणार आहे.
http://youtube.com/post/UgkxPL3hjYnlFTMI_-lZRGgA1K7F8ZvgIv9A?si=EcyUuoKjJUs_iqXq
वारकऱ्यांसाठी विमा योजना आणि दिंडी अनुदान लागू करण्यात आले आहे. मंदिर परिसर विकासासाठी 250 कोटींचा निधी देण्यात आला असून भाविकांच्या सोईसाठी 130 कोटी रुपयांचा नवीन दर्शन मंडप उभारण्यात येणार आहे. वारीदरम्यान स्वच्छता, पाणी, रस्ते, मोबाईल टॉयलेट्स अशा सुविधा अधिक सक्षम करण्यात आल्या आहेत, असेही शिंदे यांनी सांगितले.
अनियमित पावसामुळे झालेले नुकसान लक्षात घेऊन सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. कर्जमाफीसाठी समिती स्थापन करण्यात आली असून, एप्रिलपर्यंत अहवाल आणि जूनपर्यंत निर्णय देण्याबाबतचे संकेत दिले आहेत. नैसर्गिक शेतीला चालना देण्यात येणार असून, जमीन वाहून गेल्यास प्रति हेक्टर 3.47 लाख मदत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे”, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
Be Pilgrims of Progress, Not Agents of Destruction: Deputy CM Eknath Shinde’s Appeal
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















