विशेष प्रतिनिधी
मुंबई : दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच दिवशी विक्रमी ४ लाख ९९ हजार ३२१ कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. यातून सुमारे ९२,२३५ इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे. Devendra Fadnavis
मुख्यमंत्री सध्या दावोस दौऱ्यावर आहेत. दम्यान दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे काल (सोमवार) रात्री उदघाटन झाल्यानंतर आज (मंगळवार) पहिल्याच दिवशी ४ लाख ९९ हजार ३२१ कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. यातील एकच करार ३ लाख कोटींचा असून हा जेएसडब्ल्यू बरोबर करण्यात आला आहे. हा करार स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स इत्यादी क्षेत्रात करण्यात आला आहे. हा करार महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बूस्ट देणारा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले
दावोसमध्ये झालेला पहिला करार हा गडचिरोलीसाठी झाला आहे. कल्याणी समूहासोबत संरक्षण, स्टील, ईव्ही क्षेत्रासाठी हा करार झाला. या कराराअंतर्गत ५२०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून ४००० जणांना रोजगार मिळणार आहे. कल्याणी समूह, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, बालासोर अलॉय लि., विराज प्रोफाईल्स प्रा. लि., एबी इनबेव, जेएसडब्ल्यू, वारी एनर्जी, टेम्बो, एलमाँट, ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी, अवनी पॉवर बॅटरिज, जेन्सॉल, बिसलरी इंटरनॅशनल, एच टू पॉवर, झेड आर टू, ब्ल्यू एनर्जी मोटर्स, इस्सार, बुक माय शो, वेल्स्पून इत्यादी कंपन्यांबरोबर करार झाले. लॉजिस्टिक, ऑटोमोबाईल्स, स्टील, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, पायाभूत सुविधा, करमणूक, हरित ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन आदी क्षेत्रातील हे करार आहेत.
दावोसमध्ये गडचिरोलीसाठी पहिला सामंजस्य करार करण्यात आला आहे. कल्याणी समुहाकडून पोलाद उद्योगासाठी ५ हजार २५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
दावोस येथे पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक पाच लाख कोटींची गुंतवणूक नोंदवून महाराष्ट्र सरकारने विक्रमी ओपनिंग केली आहे, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. आजचा दिवस हा महाराष्ट्रासामधील गुंतवणुकीसाठी अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे. मला सांगताना आनंद वाटतो की, आज दिवसभरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुमारे पाच लाख कोटीपर्यंतची गुंतवणूक आणण्यात यश मिळालं आहे, असे त्यांनी सांगितले.
Maharashtra dominates Davos, Devendra Fadnavis signs five lakh crore
investment deals on day one
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : एकनाथ शिंदे आणि माझे संबंध राजकारणाच्या पलीकडचे, वाद लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उदय सामंत यांनी सुनावले
- Prime Minister : पंतप्रधानांची ‘मन की बात’, वाशीमचे ‘स्टार्ट अप’चे केंद्र म्हणून कौतुक
- Gulabrao Patil : झोपेत असाल त्यावेळी ठाकरे गटाचे १० आमदार कधीही इकडे येतील, गुलाबराव पाटील यांचा आदित्य ठाकरे यांना इशारा
- Rohit Pawar : रोहित पवार यांना प्रदेशाध्यक्ष पदाचे डोहाळे, म्हणाले शरद पवार भाकरी फिरविणार