विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : Shivendraraje Bhosale जबरदस्ती आणि दादागिरी चालणार नाही. यावर जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे, असा इशारा मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी छावा संघटनेला दिला आहे.Shivendraraje Bhosale
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळात मोबाइलवर रम्मी खेळतानाचा व्हिडिओ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्हायरल केला होता. त्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेने रविवारी लातूर येथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनीत तटकरे यांच्यासमोर संताप व्यक्त करत पत्ते उधळले. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ता सुरज चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. त्याच्या निषेधार्थ छावा संघटनेने लातूर बंदची हाक दिल्यावर भोसले यांनी हा इशारा दिला आहे. ते म्हणाले, लोकशाहीत आंदोलनाचा सर्वांना अधिकार आहे. जिल्हा प्रशासन आंदोलनावर लक्ष ठेवून आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये. त्याच बरोबत सर्वसामान्य आणि व्यापऱ्यांना वेठीस धरले जाऊ नये. ज्यांना स्वतःहून बंदमध्ये सहभागी व्हायचे आहे ते होतील.
दरम्यान, सूरज चव्हाण यांच्या विरोधात छावा संघटनेसह अनेक मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी घेतली. सुनील तटकरे यांच्या दौऱ्यात सूरज चव्हाण यांना सहभागी करण्यात आले नाही.
अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना तातडीने मुंबईत येऊन भेटण्याचे निर्देश दिले होते. मात्र, चव्हाण यांनी कालच्या मारहाणीत आपली बोट फ्रॅक्चर झाल्याचे कारण देत सध्या उपचारासाठी लातूरमध्येच थांबण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे, त्यांनी अजित पवार यांची भेट टाळून कारवाई पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र मराठा संघटनांचा रोष वाढत असल्यामुळे अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांची वाट न पाहता थेट ट्विटरवरूनच त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेतल्याची माहिती दिली.
Force and bullying will not be tilerated, Minister Shivendraraje Bhosale warns Chhawa organization
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या अडचणी संपेनात! सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप
- jayant patil : राजीनाम्यावर मौन सोडताना जयंत पाटील यांचे भाजप प्रवेशावर भाष्य
- Kaustubh Dhavase : मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
- Shiv Sena dispute : शिवसेनेतील वादावर तीन महिन्यात निकाल, पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हाचा होणार फैसला