विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीत निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाचे 12 उमेदवार आपल्याकडे आले होते. पण युती धर्म म्हणून आपण उमेदवार उभे केले नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
दिल्लीमध्ये लोकांनी विश्वास दाखवला आणि संपूर्ण देशभर मोदींच्या नेतृत्वाचा डंका वाजतोय असे सांगत केजरीवाल यांच्यावर टीका करताना शिंदे म्हणाले, आपचे 14 विद्यमान आमदार शिवसेनेतून लढायला तयार होते. आमच्या संपर्कात आले होते.पण, आम्ही युती धर्म पाळत विरोधकांना त्यांचा फायदा होवू नये म्हणून त्यांना भाजपात पाठवले आणि समर्थन दिले.
अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधत शिंदे म्हणाले की, “केजरीवाल अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे पुढे आले. मात्र, मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी अण्णांची साथ सोडली आणि तेव्हापासून त्यांची उलटी गिनती सुरू झाली. अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री करण्यात अण्णा हजारेजींचा मोठा वाटा होता – अण्णांच्या भ्रष्टाचाराच्या आंदोलनातूनच केजरीवालांचा जन्म झाला आणि ते मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री होताच केजरीवाल यांनी अण्णांची साथ सोडली. वैचारिकता सोडली नीतिमत्ता सोडली आणि भ्रष्टाचाराला जवळ केले. केजरीवालांची भ्रष्टाचाराची यात्रा आज संपली.
आपचा झाडून पराभव झाला आहे. दिल्लीकरांनी खऱ्या अर्थाने साफसफाई केली आहे. “जिंकलो की सगळं योग्य, पण हरलो की सगळं वाईट” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.
शिंदे यांनी ठाणे लोकसभेतील शिवसेनेच्या (शिंदे गट) ताकदीवर भर देत सांगितले की, “ठाणे लोकसभा हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. नरेश म्हस्के 12 दिवसात खासदार झाले अडीच लाखांनी निवडून आले.आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना आम्ही संपूर्ण ठाणे जिल्ह्यात पोहोचवले आहे. त्यामुळेच, बाळासाहेब आणि दिघे साहेबांचे विचार पुढे नेत असल्याने अनेक लोक आपल्या पक्षात येत आहेत. विष्यातील वाढ लक्षात घेता आम्ही आवश्यक सर्व गोष्टी करणार आहोत आणि पुढील सर्व निवडणुकांमध्ये असाच विजय मिळवत महायुतीची सत्ता आणू,.
जनतेने आम्हाला मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिले आहेत. शेतकऱ्यांपासून तरुणांपर्यंत सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळेच, आमच्या घेतलेल्या निर्णयांची नोंद रेकॉर्ड बुकमध्ये होईल.”
In Delhi elections, the alliance was followed or else…Eknath Shinde’s secret
महत्वाच्या बातम्या
- अंजली दमानिया यांच्यावर धनंजय मुंडे दाखल करणार फौजदारी अब्रुनुकसानीचा खटला
- पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात, दिल्लीत आज मतदान
- Anjali Damania : अंजली दमानिया यांनी वाचला धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराचा पाढा, कृषीमंत्री असताना दुपटीहून दराने खरेदी
- Supriya Sule : पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्र्यांचे आश्वासन