विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणावर तरुणांची माथी भडकलवल्यानंतर आता यासाठी तोट असलेल्या आत्महत्यांचे खापर मनोज जरांगे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडू लागले आहेत. तुम्हाला किती बळी घ्यायचे आहेत? मुख्यमंत्री तुम्ही आरक्षण देत नाही, ही कोणती मग्रूरी आहे असा सवाल करत अन्यथा आम्हाला भयंकर आंदोलन करावे लागणार आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे.
आरक्षणासाठी तरुणांनी केलेल्या आत्महत्यांवर जरांगे म्हणाले, मराठा बांधवांना विनंती आहे, आरक्षण 100 टक्के मिळणार आहे. जिव्हारी लागेल असे काम करू नका. काल बीड ,जालना, सिल्लोड येथे आत्महत्या करण्यात आल्या. आत्महत्या करू नका. थोडा विचार करा. तुम्ही गरजेचे आहेत.
तुम्हाला नेमके किती बळी पाहिजे. मराठा लेकरं देखील तुमची लेकरं समजा असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी केले आहे. फडणवीस तुम्ही भावनावनश होऊ नका, अन्यथा आम्हाला वेगळ आंदोलन करून तुम्हाला वेठीस आणावे लागेल. मुख्यमंत्री तातडीने आरक्षण द्या अन्यथा आमचा संयम सुटणार आहे. तुम्ही मजा पाहणार असेल तर तुम्हला याचे फळ भोगावे लागेल , असा इशारा त्यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री तुम्हाला माणुसकी नाही का? मराठाचे मुडदे पडू देऊ नका, पोरं धडाधड आत्महत्या करत आहे. तुम्हाला मराठा समाजाची दयामाया नाही. तुमच्यामुळे आमच्या आत्महत्या होत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
जरांगे यांनी यावेळी काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांच्यावरही एकेरी भाषेत टीका केली. वडेट्टीवार यांच्यावर टीका करताना ते म्हणाले,
त्याला दम निघत नाही का? तू ठेका घेतला का सर्व बोलायचा? कशामुळे बोलायचं नाही. आमची पोरं मेली भरून देतो का, माकड उठते आणि काही बोलते. तर भुजबळ यांना ते म्हणाले, त्याला घेऊ द्या काळजी. मी मराठा समाजाची काळजी घेतो.भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांचे समर्थन केले आहे. यावर जरांगे म्हणाले.
त्याचं उघड पडत आहे, जे बोलायचं आहे ते बोलून गेले. टोळीने दाखवलं किती जातीवाद असतो. असे जातीवादी शब्द महाराष्ट्राने पहिल्यांदाच ऐकले आहेत. आरोपींचे समर्थन करणारे शब्द महाराष्ट्राचं नुकसान आहे, पोटातील ओठावर आले. बाबाला दोष देत नाही, करून घेणारी टोळी आहे. स्वतः साठी देवधर्म कळेना. ओबीसी असून देखील त्यांच्यावर अन्याय झाला. आता लोक व्यक्त होत आहे. कृष्णा आंधळे एक नाही अनेक आहेत, यांनी पळवले असतील. पण आरोपींना यंत्रणा सोडणार नाही.
टोळी धनंजय मुंडे यांची आहे. आरोपींना लपवत आहे. याच्या एका नेत्याने जिवंतपणी मरण यातना भोगल्या या टोळीमुळे धनंजय मुंडे मला भेटण्यासाठी आल्यावर मला सांभाळा असे म्हणाले होते. तो रात्री आला, मी भेटायचं नाही म्हणालो. पण बाहेर थांबले म्हणून भेटलो. कराडला पहिल्यावर हाच शेतकरी हार्वेस्टर पैसे खाणारा आहे का म्हणालो होतो, असा गौप्यस्फोट त्यांनी केला .
Manoj Jarange again criticizes the Chief Minister, warns of fierce agitation
महत्वाच्या बातम्या
- Nirmala Sitharaman’ : कॅन्सरवरील औषधे, टीव्ही, मोबाईल आणि इलेक्ट्रिक कार होणार स्वस्त
- Modi Govt : मोदी सरकारची मध्यमवर्गीयांना आजपर्यंतची सर्वात मोठी भेट, एक लोक कोटी तोटा सहन करून १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
- Devendra Fadnavis भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अर्थसंकल्पाचे कौतुक