Vijay Vadettiwar : आपणच मुख्यमंत्री होणार असे अनेकांना वाटले होते, विजय वडेट्टीवार यांचा नाना पटोले यांना टोला

Vijay Vadettiwar : आपणच मुख्यमंत्री होणार असे अनेकांना वाटले होते, विजय वडेट्टीवार यांचा नाना पटोले यांना टोला

Vijay Vadettiwar

विशेष प्रतिनिधी

नागपूर : Vijay Vadettiwar विधानसभेच्या वेळेस चर्चा आणि प्लॅनिंगमध्ये आमचा वेळ वाया गेला या उध्दव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर सहमती दर्शवत लोकसभेनंतर आपणच मुख्यमंत्री होणार असे अनेकांना वाटल होते असा टोला काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी तत्कालीन अध्यक्ष नाना पटोले यांना लगावला आहे.Vijay Vadettiwar

विजय वडेट्टीवार म्हणाले, उद्धव ठाकरे म्हणत आहेत ते बरोबर आहे. आम्ही कोणाकडे बोट दाखवणार नाही. प्रत्येकाला अधिक जागा आपल्या पदरात पाडून घ्यायच्या होत्या. यामध्येच प्रचंड नुकसान झाले हे खरे आहे. लोकसभेत इंडिया आघाडीचे काम चांगले झाले. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत सहा महिन्यात एवढा फरक पडू शकतो का? प्रत्येक राज्यात पाहिले तर विरोधकांना पूर्णपणे नामशेष करणे ही भाजपची रणनीती आहे. विधानसभेच्या वेळेस जागावाटपाचा घोळ झाला. मतदार यादीत देखील घोळ होता, त्यात आम्हाला लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही.

वडेट्टीवार म्हणाले, ” राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हा सख्खे नाही चुलत भाऊ आहेत. आम्ही दूरचे भाऊ आहोत. आम्ही विचाराच्या नात्याने मानलेले भाऊ आहोत. त्यामुळे त्यांच्या घरातील गोष्टी ते आम्हाला विचारून करणार नाहीत. एकत्र येणार की नाही हे तेच सांगू शकतात.”

विधानसभेच्या परिसरात झालेल्या राड्यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, “विधानभवनात जे घडले त्यामुळे महाराष्ट्राची लाज गेली. भाजप आमदाराच्या इशाऱ्यावर हल्ला झाला. ही अब्रू मिळवण्यासाठी पुन्हा प्रयत्न करावे लागतील.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस कोसळत आहे. अवकाळी पावसाने राज्यात अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. वडेट्टीवार म्हणाले, “अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान आहे. पान नुकसणीचे पंचनामे करून अहवाल देण्याचे निर्देश अजून सरकारने दिलेले नाहीत. इतकं नुकसान होउनही शेतकऱ्यांच्या व्यथा सरकार का? समजून घेत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन रब्बी पिकांच्या नुकसणीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये मदत देण्याची मागणी आम्ही करणार आहे.”

Many thought that he would be the Chief Minister, Vijay Vadettiwar takes a dig at Nana Patole

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023