विशेष प्रतिनिधी
नंदुरबार : नंदुरबार शहरात अफवांमुळे तणाव निर्माण झाला असून, बिस्मिल्ला चौक आणि परिसरात रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास दगडफेक झाली . यावेळी जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या 15 नळकांड्या फोडल्या.
नंदुरबार शहरातील त्रिकोणी बिल्डिंग परिसरात सकाळी एका रिक्षाने तरुणाला धडक दिल्यानंतर दोन गट जमले होते. तेव्हा पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली होती. मात्र मध्यरात्री शहरातील विविध भागात अफवांना पेव फुटल्या नंतर काही संवेदनशील भागात दगडफेकीला सुरुवात झाली. शहरातील त्रिकोणी बिल्डिंग आणि परिसरात मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली.
मला बदनाम करा पण बीड जिल्ह्याला बदनाम करु नका, धनंजय मुंडे यांची विनंती
पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी 15 अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. शहरातील संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्वतः पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस, अप्पर पोलीस अधीक्षक आशीत कांबळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.
पोलिस अधीक्षक श्रावण दत्त एस, अपर पोलीस अधीक्षक कांबळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. जमावाला पांगवून आता पोलिसांकडून संशयितांना शोधण्यासाठी धरपकड सुरू आहे.शहरात अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना केले आहे. सतत घडणाऱ्या अशा घटनांमुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मात्र, तणाव कमी करण्यासाठी प्रशासनाकडून पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत.सध्या नंदुरबार शहरात तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांचा मोठा फौजफाटा संवेदनशील भागात तैनात आहे. अशा प्रकारच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांची दक्षता वाढवण्यात आली आहे.
Midnight stone pelting in Nandurbar town
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde मला बदनाम करा पण बीड जिल्ह्याला बदनाम करु नका, धनंजय मुंडे यांची विनंती
- Dhananjay Munde धनंजय मुंडे आता तरी राजीनामा द्या, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे आवाहन
- Saif Ali Khan सैफ अली खान हल्ला प्रकरणात मुख्य आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचे उघड
- Ashwini Vaishnav भारतातील डिजिटल क्रांतीचा दावोस येथे जयघोष