फलटणच्या निंबाळकरांना पुन्हा पक्षांतराचे वेध, अजित पवार गटात डेरेदाखल होण्याची तयारी

फलटणच्या निंबाळकरांना पुन्हा पक्षांतराचे वेध, अजित पवार गटात डेरेदाखल होण्याची तयारी

Nimbalkars

विशेष प्रतिनिधी

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर आरोप करत फलटणच्या रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे निंबाळकर यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता. मात्र निवडणुकीत त्यांच्या उमेदवाराचा सपाटून पराभव झाल्यानंतर त्यांना पुन्हा अजित पवार गटात प्रवेशाचे वेध लागले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तसे संकेत दिले आहेत. ते मराठी रामराजे आणि संजीवराजे निंबाळकर हे मागे अजितदादांना भेटले होते. त्यांची दादांसोबत सखोल चर्चाही झाली. पण याबाबत निर्णय झाला नाही. विधानसभा निवडणुकीच्यावेळी या सर्वांनीच शरद पवार साहेबांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. संजीवराजे निघून गेल्यावर सुद्धा त्यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर आमचा विधानसभेचा उमदेवार विजयी झाला आहे, असं सांगतानाच संजीवराजे यांना पक्षात प्रवेश द्यायचा की नाही हे राज्यसभा सदस्य नितीन पाटील आणि जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष असतील यांच्याशी चर्चा करू आणि योग्य तो निर्णय घेऊ,.

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटात होते. मात्र भाजपकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जात असल्याचं रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले होते. अजित पवार यांच्यासमोर त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती.

अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांसमोरच आपली तक्रार सांगितली.

विधानसभा निवडणुकीत योगेश कदम यांच्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काम केलं नाही, असा आरोप शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केला होता. त्यावरही सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याकडे जेव्हा शिवसेना नेते रामदास कदम हे तक्रार करतील तेव्हा त्याची मी जरूर माहिती घेईल. कारण तो सगळा विभाग दापोली, खेड, मंडणगड आणि गुहागर माझ्या मतदारसंघात येतो. त्यामुळे रामदास भाईंनी जरूर लवकरात लवकर मला ते पत्र द्यावं. त्याचं मी अवलोकनही करून माहितीही घेईल. काय काय घडलं लोकसभा आणि विधानसभेला ते समजून घेईल. रामदास भाई आणि माझे चांगले संबंध आहेत. आम्ही चर्चा करू, असं तटकरे यांनी स्पष्ट केलं.

Nimbalkars of Phaltan are facing defection again, preparing to join Ajit Pawar’s group

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023