विराेधकांचा निवडणूक आयाेगाच्या नावाने शिमगा सुरू..संजय राऊत, राेहित पवारांचे मतचाेरीचे आराेप

विराेधकांचा निवडणूक आयाेगाच्या नावाने शिमगा सुरू..संजय राऊत, राेहित पवारांचे मतचाेरीचे आराेप

Sanjay Raut, Rohit Pawar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : बिहार विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. भाजपप्रणित राष्ट्रीय लाेकशाही आघाडीला भव्य यश मिळाले आहे. निवडणुकीचे निकाल आल्यावर विराेधकांकडून निवडणूक आयाेगाच्या नावाने टीका हाेणार, इव्हीएम, मतचाेरीचे आराेप केले जाणार असे म्हटले जात हाेते. त्याप्रमाणे विराेधकांनी निवडणूक आयाेगाच्या नावाने शिमगा सुरू केला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून काॅंग्रेस नेते राहुल गांधी निवडणूक आयाेगावर टीका करत आहेत. मतदार यादीवर संशय घेत आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीतही घाेळ हाेण्याची भीती त्यांनी व्यक्त केली हाेती. मात्र, निवडणूक आयाेगाने त्यांना उत्तर दिले हाेते. मात्र, आता निकालात काॅंग्रेस आणि सर्वच विराेधी पक्ष रसातळाला गेले आहेत. त्यामुळे विराेधकांकडून टीका सुरू झाली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्स या साेशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर केलेल्या पाेस्टमध्ये म्हटले आहे की, बिहाराच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही निवडणूक आयोग आणि बीजे पी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते! एकदम महाराष्ट्र पॅटर्न!

जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्याना ५० च्या आत संपवले!



राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे आमदार राेहित पवार यांनीही निवडणूक आयाेगावर तसेच मतदान प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे. राेहित पवार यांनी केलेल्या पाेस्टमध्ये म्हटले आहे की, हरियाणा, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीकडे जनतेचा कौल होता. हे चित्र पोस्टल मतदानात देखील स्पष्ट झाले होते. #EVM व्होटिंगदरम्यान पहिला एक तास हा कल पोस्टलप्रमाणेच राहिला. परंतु पुढच्या एक दीड तासात सर्व चित्र पालटले. भाजपा आश्चर्यकारक रित्या पुढे गेली आणि धक्कादायक निकाल समोर आला. आज सेम-टू-सेम याच पद्धतीचे चित्र #बिहारचुनाव दरम्यान निकाल येताना दिसत आहे. येणाऱ्या निकालाने मतदान मोजणीत घोळ होतो यावर शिक्कामोर्तब झालं आहे. सरकारचं बुजगावणं झालेल्या यंत्रणा, निवडणूक आयोग यामुळे एकंदरीतच लोकशाही आणि पर्यायाने आरक्षण व संविधान धोक्यात आलंय हे नक्की!

महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा गुवाहाटी व्हाया सुरत जसा प्रवास झाला तसाच निवडणूक निकाल लावण्याचा आयोगाचा प्रवास हरियाणा टू बिहार व्हाया महाराष्ट्र असा दिसून येतो. असो, ही निवडणूक थेट बिहारची जनता विरुद्ध इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्यात आहे.

तेजस्वी यादव @Tejashwi Yadav यांना मिळालेला प्रतिसाद त्यांच्या सभांमध्ये उसळलेला जनसागर आणि त्यांनी युवांचे, शेतकऱ्यांचे मांडलेले प्रश्न बघता आजचा निकाल काहीही लागला, तरी जनतेची खरी पसंद आणि जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मात्र तेजस्वी यादव आहेत यात तिळमात्र शंका नाही.

Opponents start slandering in the name of Election Commission..Sanjay Raut, Rohit Pawar allege vote rigging

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023