विशेष प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : Nilesh Rane माध्यमांनी दाखवायचं बंद केलं तर पाच दिवसात लोकं संजय राऊत कोण हे विसरतील असा टोला शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी लगावला आहे.Nilesh Rane
पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले,
संजय राऊत कधी जनतेतून निवडून आलेत का ? बरोबर एक तरी आमदार आहे का? जो एका महिलेला शिवीगाळ करतो, पत्रकाराच्या माईकवर थुंकतो, नेत्यांबद्दल अर्वाच्य भाषेमध्ये बोलतो. मीडियाने दाखवायचं बंद केलं तर पाच दिवसात लोकं संजय राऊत कोण हे विसरतील. संजय राऊत यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही. ते रोज अशी फालतू विधानं करत असतात. संजय राऊतला मीडियामध्ये का जिवंत ठेवलं आहे? तो माणसाचे महाराष्ट्रासाठी योगदान काय? संजय राऊत यांना दुसरा काही काम धंदा नाही.
Rohit Pawar : रोहित पवार यांना प्रदेशाध्यक्ष पदाचे डोहाळे, म्हणाले शरद पवार भाकरी फिरविणार
राऊलताना राणे म्हणाले,
मी माझ्या मनोगतात स्पष्ट केलेय की, आपण महायुतीत आहोत. आम्ही कुठेही असलो तरी महायुतीत असून एका कुटुंबाचा भाग आहोत. म्हणून काही आम्ही वेगळे विचार किंवा वेगळी भूमिका नाही. माझ्या बरोबर ही मंडळी अनेक वर्षे काम करत आहेत. त्यांनी आम्ही आपल्याबरोबर आहोत, असे स्पष्ट केले. माझी तिन्ही गटात जीवाभावाची माणसे आहेत. आम्ही युती म्हणून काम करतो. शिवसेनेच्या वाटचालीसाठी आज मेळावा घेतला होता. अनेक लोकं आजही शिवसेनेत येण्यास उत्सुक आहेत.
राणे म्हणाले,
नितेश राणे यांना पालकमंत्री पद दिल्यानंतर त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांच्या कामात पारदर्शकता असते, सर्व अवैध धंदे बंद झालेच पाहिजे. नितेश राणे यांनी एकदा विषय हातात घेतला तो ते पूर्ण करणार, मी त्यांच्या भूमिकेचे समर्थन करतो.
चिपी विमानतळासाठी प्रयत्न सुरु आहेत. हा विषय केंद्राशी निगडीत आहे, नारायण राणे प्रयत्न करत आहेत, असे त्यांनी सांगितले.
So in five days people will forget who Sanjay Raut is, says Nilesh Rane
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : एकनाथ शिंदे आणि माझे संबंध राजकारणाच्या पलीकडचे, वाद लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उदय सामंत यांनी सुनावले
- Prime Minister : पंतप्रधानांची ‘मन की बात’, वाशीमचे ‘स्टार्ट अप’चे केंद्र म्हणून कौतुक
- Gulabrao Patil : झोपेत असाल त्यावेळी ठाकरे गटाचे १० आमदार कधीही इकडे येतील, गुलाबराव पाटील यांचा आदित्य ठाकरे यांना इशारा
- Rohit Pawar : रोहित पवार यांना प्रदेशाध्यक्ष पदाचे डोहाळे, म्हणाले शरद पवार भाकरी फिरविणार