विशेष प्रतिनिधी
बीड : Sudarshan Ghule मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड हाच मास्टरमाईंड असल्याचे म्हटले जात होते. आका म्हणून कराडवर आरोप होत होते. पण सीआयडी तपासातून वाल्मीक कराड नव्हे सुदर्शन घुले हा मास्टरमाईंड असल्याचे म्हटले आहे. आश्चर्य म्हणजे घुले गँग लीडर तर कराड त्याच्या टोळीचा सदस्य असे दाखविले आहे.Sudarshan Ghule
9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांनी ही हत्या केल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. सुदर्शन घुले याने पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली होती. यात संतोष देशमुखांनी हस्तक्षेप केला होता. यातूनच सुदर्शन घुलेसह इतर आरोपींनी संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांचा जीव घेतला.
या हत्येत सुदर्शन घुलेचा प्रत्यक्ष सहभाग असला तरी या गुन्ह्यामुळे वाल्मीक कराडच खरा मास्टरमाइंड असल्याचा आरोप सुरुवातीपासून होत आहे. वाल्मीक कराडला अटक करावी, यासाठी राज्यभरात मोठमोठी आंदोलनं देखील झाली. वाल्मीक कराडला अटक करून त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणाचा खरा सूत्रधार वाल्मीक कराड हाच असल्याचा आरोप सुरुवातीपासून होत आहे.
मात्र, सीआयडीने संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले याला गँगचा लीडर दाखवलं आहे, तर वाल्मीक कराड हा सुदर्शन घुलेच्या गँगचा सदस्य असल्याचं म्हटलं आहे. सीआयडीच्या या खुलाशानंतर वाल्मीक कराड नव्हे तर सुदर्शन घुले हाच खरा मास्टरमाइंड असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असू शकतो, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने तपास केला जात आहे.
सीआयडीने संतोष देशमुख खून प्रकरणात सुदर्शन घुले याला गँगचा लीडर आणि वाल्मीक कराडला गँगचा सदस्य असल्याचं म्हटल्यानंतर सीआयडीमध्ये देखील मोठे बदल करण्यात आले आहेत. सीआयडीचे तपास अधिकारी बदलण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडीचे उपअधीक्षक अनिल गुजर करीत होते. पण आता त्यांच्या जागी अपर पोलीस अधीक्षक किरण पाटील हे या प्रकरणाचा तपास करणार आहेत.
Sudarshan Ghule was the mastermind and not Valmik Karad, CID investigation revealed
महत्वाच्या बातम्या
- शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
- कुणाशी जरी लागेबांधे असले तरी आरोपीला सोडणार नाही, एकनाथ शिंदे यांची ग्वाही
- प्रजासत्ताकदिनी काँग्रेसची ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ रॅली
- सर्वोच्च न्यायालयात निर्णय झाला तर तीन-चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मुख्यमंत्र्यांची माहिती