विशेष प्रतिनिधी
लातूर : Suraj Chavan उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सूरज चव्हाण यांची प्रवक्तेपदी निवड केल्याने छावा संघटना आक्रमक झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अजित पवार यांच्या ज्या प्रचारसभा होतील, त्या सभांमध्ये शेतकऱ्यांसह उपस्थित राहून या निवडीला विरोध दर्शवण्याचा इशारा छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी दिला आहे.Suraj Chavan
काही महिन्यांपूर्वी लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणामुळे सूरज चव्हाण यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. मात्र, आता काहीच दिवसांत चव्हाण यांचे राजकीय पुनर्वसन करून त्यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. याच कारणामुळे छावा संघटनेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करत तीव्र विरोध दर्शविला आहे.Suraj Chavan
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडण्यासाठी 17 जणांची नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, या यादीतून आमदार अमोल मिटकरी आणि रुपाली पाटील ठोंबरे यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे, तर दुसरीकडे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याच्या आरोपांमुळे निलंबित झालेले सूरज चव्हाण यांना प्रवक्तेपदी संधी देण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हे पत्रक जारी केले आहे.Suraj Chavan
सुषमा अंधारे यांनी त्यांच्या फेसबुकवर एक पोस्ट लिहीत राष्ट्रवादी पक्षावर थेट संशयच व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, कुठल्याही पक्षाने पदाधिकारी नेमणे हा त्यांचा पूर्णतः अंतर्गत विषय आहे. मात्र तरीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या या यादीतील एकूण नाव बघता एक फरक लक्षात येईल. अमोल मिटकरी आणि रूपाली ठोंबरे हे दोन्ही प्रवक्ते कायम दादांसाठी खिंड लढवत असतात मात्र त्यांना या यादीत स्थान नाही.
पण अगदी त्याच वेळेला मित्र पक्षातल्या आमदारांकडून दादांवर पराकोटीची जहरी टीका होताना अतिशय मौन बाळगणारे सुरज चव्हाण, सुनील तटकरेंवर कोणी चकार शब्द काढला तर अगदी मारामारी करण्यापर्यंतची तत्परता दाखवू शकतात. कदाचित म्हणूनच या यादीत सुरज चव्हाण ला स्थान आहे. थोडक्यात काय जो दादांची बाजू घेईल त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, अशी खोचक टीका अंधारेंनी केली आहे.
Suraj Chavan Appointed as Spokesperson; Chhava Organization Warns of Disrupting Ajit Pawar’s Rallies
महत्वाच्या बातम्या
- हत्येच्या कटातील आराेपी जरांगेचेच कार्यकर्ते, धनंजय मुंडे यांचा खळबळजनक आराेप
- Ambadas Danve : मुलगा पुण्यात ३०० कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला…! अंबादास दानवे यांचा अजित पवारांवर निशाणा
- राजद म्हणजे खंडणी, घराणेशाही आणि घोटाळा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल
- स्लीपर वंदे भारत ट्रेन धावली ताशी १८० किमी वेगाने, डेस्कवरचे पाणीही नाही सांडले



















