Saif’s : ब्लॅकमेलिंगचा अँगल? सैफच्या मुलाच्या आयाकडून आरोपी मागत होता एक कोटी

Saif’s : ब्लॅकमेलिंगचा अँगल? सैफच्या मुलाच्या आयाकडून आरोपी मागत होता एक कोटी

Saif's

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Saif’s सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीने सैफच्या मुलाच्या आयाकडून 1 कोटी रुपये मागितले होते. त्यातूनच सैफ आणि त्याची झटापट झाली. यामध्ये आरोपीने सैफवर चाकूने वार केले अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार असल्याचा संशय आता व्यक्त होत आहे.Saif’s

1 कोटीच्या मागणीवरून आरोपी आणि सैफच्या घरात काम करणाऱ्या मोलकरीणमध्ये वाद झाला होता. सैफने यामध्ये हस्तक्षेप करताच आरोपीने त्याच्यावर वार केल्याचं समोर आलं आहे. सैफचा मुलगा जहांगीरची देखभाल करणाऱ्या नर्स एलियामाच्या जबाबात आरोपीने 1 कोटी मागितल्याचा उल्लेख असल्याची माहिती समोर येत आहे. हल्ल्यात सैफ अली खान आणि दोन मोलकरीण जखमी झाल्या. दरम्यान, सैफ अली खान यांच्या घरातील काम करणारी मोलकरीण लिमा हिची देखील पोलिसांकडून चौकशी झाली आहे आणि या चौकशीनंतर ती पुन्हा सैफ अली खान यांच्या घरी परतली आहे.



सैफ अली खान हल्ला प्रकरणी मुंबई पोलिसांनी 10 पथकं तयार केली आहेत. आरोपी घरात कसा शिरला? हल्ला करून कसा बाहेर पडला? या सगळ्या गोष्टींचा तपास सुरू आहे. सुरक्षेसाठी असलेल्या शिडीवरून आरोपी घरात घुसला आणि त्याच शिडीवरून पळून गेला असा पोलिसांचा अंदाज आहे. सैफ अली खानवर सहा वार करण्यात आले. वार झाल्यानंतर सैफ अली खानला जखमी अवस्थेत रिक्षातून लीलावती रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. मिळालेल्या माहितीप्रमाणे या प्रकरणी क्राईम इंटेलिजन्स युनिट ही तपास करत आहे.

ज्या व्यक्तीने सैफ अली खानच्या घरात चोरी करून हल्ला केला तो सराईत गुन्हेगार असू शकतो. ही घटना ज्या पद्धतीने घडली त्याची मोडस ऑपरेंडी पाहता हल्लेखोरावर यापूर्वीही असेच गुन्हे दाखल झाले असावेत. पोलिसांचा असा विश्वास आहे की, अशाप्रकारे फक्त सराईत आरोपीच करू शकतात. हल्ल्याच्या वेळी डम डेटाच्या आधारे आरोपीची ओळख पटली, पोलिसांना त्या भागात कोणते मोबाईल नेटवर्क सक्रिय होते याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी या प्रकरणात सैफच्या इमारतीमधील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. या सीसीटीव्हीत आरोपी रात्री अडीच वाजेच्या सुमारास पायऱ्या उतरताना दिसत आहे. त्याचा चेहरा सीसीटीव्हीत अतिशय अचूकपणे कैद झाला आहे.

The blackmailing angle? The accused was demanding one crore from Saif’s son’s nanny

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023