Uttam Jankar उत्तम जानकर यांची पुन्हा एकदा राजकीय तमाशाची तयारी , म्हणे २३ जानेवारी रोजी निवडणूक आयोगाकडे आमदारकीचा राजीनामा देणार

Uttam Jankar उत्तम जानकर यांची पुन्हा एकदा राजकीय तमाशाची तयारी , म्हणे २३ जानेवारी रोजी निवडणूक आयोगाकडे आमदारकीचा राजीनामा देणार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी पुन्हा एकदा राजकीय तमाशाची तयारी सुरू केली आहे. २३ जानेवारी रोजी आपण आमदारकीचा राजीनामा दिल्लीत निवडणूक आयोगाकडे देणार असल्याचे म्हटले आहे. मात्र ही त्यांची केवळ चमकोगीरी असल्याची टीका होत आहे. कारण निवडणूक आयोगाकडे राजीनामा दिला तरी स्वीकारण्याची कायदेशीर तरतूद नाही. आमदाराला खरेच राजीनामा द्यायचा असेल तर विधानसभा अध्यक्षांकडे द्यावा लागतो. Uttam Jankar

जानकर विधानसभेच्या निवडणुकीनंतर ईव्हीएमचा मुद्दा अनेकदा उपस्थित केला. आंदोलनाचाही इशारा दिला होता. बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणीही त्यांनी केली होती. आता जानकर यांनी जाहीर केले आहे की “२३ जानेवारी रोजी आपण आमदारकीचा राजीनामा दिल्लीत निवडणूक आयोगाकडे देणार आहे”, माळशिरस मतदारसंघात बॅलेट पेपरवर पोटनिवडणूक घेण्यात यावी अन्यथा आम्ही दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणार आहे.

जानकर म्हणाले, “ईव्हीएमच्या मुद्याला मारकडवाडीत गावातून सुरुवात झाली आणि तोच आक्रोश संपूर्ण माळशिरस तालुक्यात आहे. आता माळशिरस तालुक्यातील धानोरे या गावात देखील ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी १२०६ लोकांनी हात वरती करून मतदान केलं. पण त्या गावात मला ९६३ एवढेच मते दाखवण्यात आलेली आहेत. आता धानोरे गावातील १२०० लोकांनी प्रतिज्ञापत्र दिले आहेत आणि धानोरे गावातील मतदानाची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. आता जर निवडणूक आयोग मतदानाची पडताळणी करणार नसेल तर २३ जानेवारी रोजी मी आमदारकीचा राजीनामा देणार आहे.

“आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर २५ जानेवारी रोजी दिल्लीतील जंतरमंतरवर मी (उत्तम जानकर) आणि बच्चू कडू आम्ही आंदोलन करणार आहोत. तसेच माझ्या मतदारसंघाची पोटनिवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी अशी आमची मागणी आहे. मात्र, जर निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी मान्य केली नाही तर आम्ही दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणार आहोत. दिल्लीत देखील अशाच प्रकारचा ईव्हीएमचा विषय सुरु आहे. त्यामुळे आमच्याबरोबर राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल हे देखील सहभागी होतील.

धानोरे गावातील १२०० लोकांनी प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाच्या नावाने दिलेलं आहे. तसेच मारकडवाडीच्या १४६६ लोकांनी प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे. हे प्रतिज्ञापत्र आम्ही निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहोत. त्यानंतर आंदोलन करणार आहोत. देशात निवडणूक पारदर्शी व्हावी अशी राहुल गांधी यांची देखील भूमिका आहे. मी राजीनामा देणार याविषयी अद्याप शरद पवार यांच्याशी बोललो नाही. मात्र, मी त्यांच्याशी बोलून २३ जानेवारी रोजी राजीनामा देणार आहे”, असं जानकर यांनी म्हटले आहे.

आता हा केवळ राजकीय तमाशा का तर आमदार /खासदारांनी आपला राजीनामा पक्षाध्यक्ष किंवा सभागृहातील पक्षाच्या प्रतोदकडे किंवा जानकर म्हणतात त्याप्रमाणे निवडणूक आयोगाकडे सोपवणे हे निव्वळ ढोंग आहे. अशा प्रकारे ज्याला राजीनामा स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकारच नाही.

समजा राजीनामा पत्र, सभागृहाचे विधानसभा अध्यक्ष अथवा त्यावेळी राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार असलेला पीठासीन अधिकारी यांना उद्देशून लिहिलेले नसले, तर त्याला राजीनामा म्हणताच येत नाही. आता जानकर यांच्या या राजकीय तमाशात ते म्हणतात त्याप्रमाणे राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल सहभागी होतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Uttam Jankar is once again preparing for a political show

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023