Valmik Karad : वाल्मिक कराडने जिल्हाधिकारी कार्यालयात मारले, करुणा मुंडेंचा मोठा आरोप

Valmik Karad : वाल्मिक कराडने जिल्हाधिकारी कार्यालयात मारले, करुणा मुंडेंचा मोठा आरोप

Valmik Karad

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Valmik Karad धंनजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या पतीवर आणि वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनीदावा केला आहे की, वाल्मिक कराडने जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना मारहाण केली. त्याचबरोबर, हे सर्व सुरु असताना त्यांचे पती धंनजय मुंडे आणि पोलिसांकडून त्यांना मदतीची अपेक्षा असताना त्यांनी काहीच मदत केली नाही.Valmik Karad

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात विरोधक आणि सत्ताधारी आमदारांच्या रडारवर असलेले राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सतत आरोप होत आहेत.



शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास करुणा मुंडे यांनी एक पोस्ट शेअर केली, ज्यात त्यांनी म्हटले आहे, “माझ्या नवऱ्याने मला जिवंत गाडले असते तरी चालले असते, पण एक दोन कवडीच्या गुंडानी मला माझ्या नवऱ्यासमोर मारले.” करुणा मुंडे यांच्या या आरोपांमुळे पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे.

यापूर्वीही करुणा मुंडे यांनी मुंडे आणि वाल्मीक कराड याच्यावर आरोप केले होते. करुणा मुंडे यांनी थेट हायकोर्टात धाव घेत धनंजय मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप होता. धनंजय मुंडेंनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवली असल्याचा आरोप केला होता.

करुणा मुंडे यांनी परळीतून विधानसभा निवडणूक लढवायची प्रयत्न केला होता पण त्यांचा अर्ज बाद झाला. करुणा मुंडे यांनी सोशल मीडियावर त्यांचा अर्ज बाद झाल्यानंतर व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये त्या ढसढसा रडत होत्या. अर्ज बाद झाल्याबद्दल त्यांनी धनंजय मुंडे यांना खडेबोल सुनावले. करुणा मुंडे म्हणाल्या की, महाराष्ट्रात लोकशाही संपली आहे. महाराष्ट्रात लोकशाहीच राहिलेली नाही. मी परळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता. परळीत सुरु असलेल्या गुंडगिरी, अन्याय आणि अत्याचाराविरोधात मी आवाज उठवलेला होता. मला कोणाचा सपोर्ट नसताना आणि माझा मोठा पक्ष नसताना मी लढत होते. मला जनतेवर विश्वास आहे. त्यामुळेच मी परळीमधून अर्ज भरला होता.

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

Warkaris

Warkaris : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला मुर्तरूप, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत आयोजित शिबीराचा १५ हजाराहून अधिक वारकऱ्यांनी घेतला लाभ

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023