विशेष प्रतिनिधी
सोलापूर : वाळू माफियांनी राज्यात सगळीकडेच थैमान घातलेले असताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अवैध वाळू खडी क्रशर यांना अभय देण्याच्या सूचना केली आहे.
सोलापूर जिल्ह्यात बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी नवीन पालकमंत्री जय कुमार गोरे याना उद्देशून वाळू उपशाकडे दुर्लक्ष करण्याची जाहीरपणे सूचना केली.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सोलापूर जिल्हा मोठा आहे. जिल्ह्यात खडी क्रशर, वाळूच्या गाड्या मोठ्या प्रमाणात चालतात. इथे कलेक्टर कुमार आशीर्वाद असले तरी वाळू आणि खडी क्रशर गाड्या चालू द्या. सगळे आपलेच माणसे आहेत.
याच राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याचे महसूलमंत्री असताना महसूल खात्याच्याकडून वाळू घरपोहोच दिली जाण्याची घोषणा केली होती. यापुढे वाळू उपसा करण्याचा ठेका दिला जाणार नाही. सरकार स्वतः वाळू काढेल आणि ती ग्राहकांना घरपोहोच देईल अशी घोषणा केली होती .
मात्र ही घोषणा प्रत्यक्षात उतरलीच नाही. त्यावेळी विखे पाटील म्हणाले होते की यावेळी विखे पाटील म्हणाले की, बेकायदेशीर वाळू उत्खनातून महाराष्ट्रात वाळू माफियांचे साम्राज्य निर्माण झाले आहे .अवैध वाळू विक्री वाढली आहे. पर्यावरणाची हानी होत होती.
यातून शासनाचा ही कोट्यवधीचा महसूल बुडत होता. यामुळे शासनाने सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात वाळू उपलब्ध करुन देण्याकरीता वाळूचे उत्खनन, साठवणूक व विक्री ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्याचा निर्णय घेतला आहे.
Water Resources Minister Radhakrishna Vikhe Patil says
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : एकनाथ शिंदे आणि माझे संबंध राजकारणाच्या पलीकडचे, वाद लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उदय सामंत यांनी सुनावले
- Prime Minister : पंतप्रधानांची ‘मन की बात’, वाशीमचे ‘स्टार्ट अप’चे केंद्र म्हणून कौतुक
- Gulabrao Patil : झोपेत असाल त्यावेळी ठाकरे गटाचे १० आमदार कधीही इकडे येतील, गुलाबराव पाटील यांचा आदित्य ठाकरे यांना इशारा
- Rohit Pawar : रोहित पवार यांना प्रदेशाध्यक्ष पदाचे डोहाळे, म्हणाले शरद पवार भाकरी फिरविणार