विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर : Woman commits विवाहित मुलीला गल्लीतीलच एका व्यक्तीने पळून नेल्यानंतरही पाेलीस तपास करण्यास तयार नसल्याने महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. उस्मानपुरा भागात गुरुवारी हा प्रकार घडला. महिलेच्या संतप्त नातेवाईकांनी मृतदेह पाेलीस ठाण्यासमाेर आणून ठेवला हाेता. त्यामुळे तणाव निर्माण झाला हाेता.Woman commits
रेखा राजू जाधव (५०) या महिलेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेनंतर नागरिकांनी मृतदेह थेट ठाण्यात आणत रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत ठिय्या मांडला. यामुळे उस्मानपुरा पोलिस ठाण्यासमोर तणाव निर्माण झाला. या प्रकरणी मृत महिलेचा मुलगा विजय राजू जाधव (३३) याच्या फिर्यादीवरून आठ जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Woman commits
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव यांची २१ वर्षांची विवाहित मुलगी ८ नोव्हेंबर रोजी घरातून निघून गेल्यापासून घरात तणावाचे वातावरण होते. बेपत्ता तरुणीच्या पतीने उस्मानपुरा ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. दरम्यान, मुलगी बुलढाण्यात असल्याची माहिती ९ नोव्हेंबर रोजी पोलिसांना मिळाली. गल्लीतील एका व्यक्तीने तिला पळून नेल्याचे समोर आले, अशी माहिती नातेवाइकांनी दिली. परंतु रात्री उशीर झाल्याने पोलिसांनी दुसऱ्या दिवशी जाण्याचे सांगितले. याच वेळी मुलीने जागा बदलल्याने ती सापडू शकली नाही. या सर्व घटनांमुळे रेखा या तणावात असल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे.
मुलगी बेपत्ता झाल्यानंतर वाढलेल्या मानसिक तणावामुळे रेखा जाधव यांनी घरातच गळफास घेतल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. पोलिसांनी माहिती मिळताच त्या ठिकाणी जाऊन मुलीसह इतर संशयितांना ताब्यात घेतले असते तर ही वेळ आली नसती, असे नातेवाइकांचे म्हणणे आहे. मृत महिलेचा मुलगा रिक्षाचालक असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पती घरासोमर झाडलोट करत असताना रेखाबाई यांनी घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले. ही घटना समोर येताच संतप्त नातेवाइकांनी पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली आणि थेट पोलिस ठाण्यात मृतदेह आणून ठेवला. घटनास्थळी सहायक पोलिस आयुक्त मनीष कल्याणकर, निरीक्षक गजानन कल्याणकर, कृष्णा शिंदे आणि संग्राम ताटे यांनी नागरिकांची समजूत काढली.
फिर्यादीवरून वैभव बोरडे, विशाल बोरडे, नंदू पवार, राजेंद्र पवार, गौरव बोरडे यांच्यासह चार महिलांवर कलम १०८ व ३(५) अंतर्गत आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उस्मानपुरा पोलिस करीत आहेत.
Woman commits suicide as police fail to investigate daughter’s abduction
महत्वाच्या बातम्या
- District Collector : निवडणूक प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंध, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
- Shiv Sena, : शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणी पुढील वर्षी जानेवारीमध्ये
- कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र, ड्रग प्रकरणातील आरोपींच्या भाजप प्रवेशावरून नाना पटोले यांचा सवाल
- काेरेगाव पार्क जमीन प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा, अंजली दमानिया यांची मागणी



















