विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chhagan Bhujbal मी राज्यसभेसाठी इच्छुक होतो. माझ्या जागी कुटुंबात मंत्रिपद मिळायला हवे अशी माझी मागणी होती. कारण, पक्षातील अनेक नेत्यांच्या मुलांबाळांना पक्षाने अश संधी दिलेली आहे. तो न्याय मला का नाही, असा सवाल अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केला.Chhagan Bhujbal
राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याबद्दल नाराजी नसल्याचे सांगत खंत भुजबळ यांनी व्यक्त केली. पक्षातील अनेक नेत्यांच्या कुटुंबीयांना राज्य आणि केंद्र या दोन्ही स्तरांवर प्रतिनिधित्वाची संधी मिळाली असून, तोच न्याय आपल्यालाही मिळावा, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सोमवारी स्पष्ट केले.Chhagan Bhujbal
भुजबळ यांनी सांगितले की, आपण राज्यसभेसाठी इच्छुक होतो आणि आपल्या जागी कुटुंबातील सदस्याला मंत्रिमंडळात संधी मिळावी, अशी मागणी पक्षाकडे केली होती. मात्र ती मागणी मान्य झाली नाही. त्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेसाठी राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली. जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते स्वतः विधिमंडळात उपस्थित होते.Chhagan Bhujbal
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले की, राज्यसभेवर जाण्याची संधी चार वेळा आली, मात्र प्रत्यक्षात ती मिळू शकली नाही. पक्षातील इतर अनेक नेत्यांच्या कुटुंबीयांना विविध पदांवर संधी देण्यात आली आहे. त्यामुळे पक्ष स्थापनेपासून कार्यरत असलेल्या आपल्या कुटुंबालाही तशीच संधी मिळणे अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले.
भाजपने आपल्या उमेदवारीला नकार दिलेला नव्हता, असे सांगताना भुजबळ म्हणाले की, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ एक दिवस शिल्लक असताना आपल्या जागी समीर भुजबळ यांना मंत्रिपद देण्याबाबत केंद्राशी आवश्यक चर्चा होऊ शकली नाही. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात संधी देण्याबाबत विचार केला जाईल, असे आश्वासन मिळाल्याने राज्यसभेची संधी सोडावी लागली.
तथापि, आपण नाराज नसल्याचे स्पष्ट करत भुजबळ म्हणाले, “आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा संधी नक्की मिळेल. मी कबड्डीचा खेळाडू आहे, बुद्धीबळातील प्यादे नाही.”
दरम्यान, भुजबळ यांनी कुटुंबीयांना मिळणाऱ्या राजकीय संधींबाबत केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही प्रतिक्रिया दिली. “मी, माझी मुलगी आदिती तटकरे आणि आता अनिकेत तटकरे निवडून आले आहेत,” असे सांगत त्यांनी भुजबळांना टोला लगावला.
तटकरे म्हणाले की, कोणत्याही राजकीय पक्षाला सर्वांचे समाधान करणे शक्य नसते. छगन भुजबळ हे पक्षाचे संस्थापक नेते असून त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांना अपेक्षित असलेल्या अनेक गोष्टी यापूर्वी घडल्या आहेत आणि भविष्यातही त्यांना योग्य सन्मान मिळत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Many Leaders’ Children Got Opportunities in the Party, Why Not Me? Chhagan Bhujbal Questions
महत्वाच्या बातम्या