विशेष प्रतिनिधी
मुंबई : Vijay Shivtare महाराष्ट्राचा बिहार झाला आहे. कारण इथं प्रादेशिक समतोल न राखता जातीय समतोल राखण्यासाठी प्राधान्य दिल्याचं दिसत आहे,” असा हल्लाबोल विजय शिवतारे यांनी केला.Vijay Shivtare
यामध्ये पुरंदरचे शिवसेना आमदार आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही. मंत्रिमंडळात संधी मिळाली नसल्याने आमदार शिवतारे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे.
शिवतारे म्हणाले की, “मला मंत्रिपद मिळालं नाही, याचं जास्त वाईट वाटत नाही. मात्र महायुतीतील तीनही नेत्यांनी जी वागणूक दिली, ती चुकीची आहे. हे नेते साधे भेटायलाही तयार नाहीत.
अडीच वर्षांनंतर मंत्रिमंडळात फेरबदल करून नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट केलं जाईल, असं महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी सांगितलं आहे. त्यानुसार तुम्हाला अडीच वर्षांनी मंत्रिपदाचं आश्वासन देण्यात आलं आहे का, असा प्रश्न विजय शिवतारे यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी म्हटलं की, “आता अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी मी ते घेणार नाही. आम्ही या नेत्यांचे गुलाम नाही,” असं म्हणत शिवतारे यांनी आपल्या आक्रमक भावना व्यक्त केल्या.
रविवारी एकाचवेळी ३३ कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली. त्यामुळे फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळात ४२ मंत्री झाले असून एक मंत्रिपद रिक्त आहे. येथील राजभवनच्या हिरवळीवर आयोजित दिमाखदार समारंभात राज्यपाल सी. पी.
That’s why Vijay Shivtare said Maharashtra has become Bihar
महत्वाच्या बातम्या
- Bhujbal भुजबळ समर्थकांचे ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन
- Amit Shah : नक्षलवाद सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील तरुणांची अमित शहा यांनी घेतली भेट
- Mani Shankar Aiyar मणिशंकर अय्यर म्हणाले- गांधी परिवाराने माझे करिअर उद्ध्वस्त केले, सोनिया-राहुल 10 वर्षांत एकदा भेटले
- भाजपकडून होणार हे मंत्री, सर्व समाज घटकांना आणि राज्यातील विभागांना प्रतिनिधित्व