विशेष प्रतिनिधी
पुणे : आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी करून एक जण पुणे पोलीस आयुक्तालयात पोहोचला. वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटल्यानंतर माझा मित्रही आयपीएस असल्याचे त्याने सांगितलं. मित्राबाबत अधिक माहिती विचारताच जे नाव घेतलं तोच समोर आल्यानं बनावट आयपीएस अधिकाऱ्याचं पितळं उघडं पडलं. आता या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Fake IPS Officer
सागर वाघमोडे असं या तोतया अधिकाऱ्याचं नाव आहे. वाघमोडे मूळचा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातला आहे. वाघमोडे हा आपण आयपीएस अधिकारी असल्याचं सांगत फिरत होता. तो पुणे पोलीस आयुक्तालयात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटला.
त्यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संशय आल्यानंतर त्यांनी अधिक चौकशी केली. तेव्हा चौकशीत त्याचं पितळ उघडं पडलं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर आता चौकशी सुरू आहे. पोलीस आयुक्तालयात तो का गेला? कुणाला भेटला? त्याचा काय उद्देश होता? यामागचा तपास केला जात आहे.
Fake IPS Officer Nabbed Inside Pune Police Commissioner’s Office!
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















