विशेष प्रतिनिधी
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधितपार्थ पवार यांच्याशी संबंधीत मुंढवा येथील घोटाळा उघडकीस आल्यानंतर लगेच बोपोडीतील जमीन घोटाळा समोर आला. या दोन्ही घोटाळ्यांवरून कारवाई सुरू असतानाच आता पुन्हा एकदा पुण्यातील हवेली येथील जमीन घोटाळा समोर आला आहे. या प्रकरणी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कारवाईचे आदेश दिले असून एका महिला अधिकाऱ्याला लगेच निलंबित सुद्धा करण्यात आले आहे. Tathawade
ताथवडे येथील 15 एकर शासकीय जागेची परस्पर विक्री करण्यात आल्याचे समोर आले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे परिसरातील पशुसंवर्धन विभागाची सर्वे नंबर 20 येथील 15 एकर जागेची कोट्यवधी रुपयांना परस्पर विक्री करण्यात आली आहे. हेरंब गुपचूप नावाच्या व्यक्तीने जानेवारी 2025 मध्ये या जागेची विक्री परस्पर केली आहे. पशुसंवर्धन विभागाला अंधारात ठेवून या जागेची विक्री करण्यात आली आहे. मुद्रांक शुल्क विभागाकडून याबाबतची माहिती जेव्हा पशुसंवर्धन विभागाला कळविण्यात आली. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तांनी या विषयाची तक्रार पुण्याचे विभागीय आयुक्ताकडे केली आहे.
आता या प्रकरणात पुण्याचे विभागीय आयुक्त आणि पशुसंवर्धन विभागाकडून चौकशी सुरू आहे. मात्र, पिंपरी चिंचवड शहरातील कोट्यवधी रुपयाची शासकीय मोक्याची जागा या निमित्ताने लाटण्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. या प्रकरणी हवेली येथील सहाय्यक दुय्यम निबंधक विद्या शंकर बडे – सांगळे यांना निलंबित करण्यात आले आहे. महसूल मंत्री बावनकुळे यांनी या निलंबनाचे आदेश दिले आहेत. मंत्री बावनकुळेंकडून महसूल विभागाची झाडाझडती घेण्यास सुरुवात झाली आहे. गैरव्यवहार करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे.
Mutual sale of 15 acres of government land in Tathawade
महत्वाच्या बातम्या
- District Collector : निवडणूक प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंध, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
- Shiv Sena, : शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणी पुढील वर्षी जानेवारीमध्ये
- कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र, ड्रग प्रकरणातील आरोपींच्या भाजप प्रवेशावरून नाना पटोले यांचा सवाल
- काेरेगाव पार्क जमीन प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा, अंजली दमानिया यांची मागणी



















