विशेष प्रतिनिधी
पुणे : परळी बंद हे मूठभर समाजकंटकांचे काम आहे.हा बंद उत्स्फूर्त लोकांचा नाही. पाच-पन्नास पोरं मोटार सायकलवर फिरवून दाब देऊन दुकान बंद करत आहेत, असा आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. Bajrang Sonwane
पुण्यात पत्रकारांशी बोलताना सोनवणे म्हणाले, वाल्मिक कराड तपासात दोषी आढळल्याने हा मकोका लागला आहे.खुनाचा कट रचण्यामध्ये मध्ये सहभागी आहेत असं एसआयटीने कोर्टात सांगितला आहे.Bajrang Sonwane
पोलीस अधीक्षक जागृतीने काम करत आहेत असे सांगून ते म्हणाले, पोलीस यंत्रणेचे यावर काही नियोजन असेल.पण दडपशाहीने असं कोणी बंद करू शकत नाही
मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे मास्टरमाइंड सापडला पाहिजे. त्यांना पळून जायला कोणी कोणी साथ दिली कट कोणी रचला हे सगळं बाहेर आलं पाहिजे, अशी मागणी सोनवणे यांनी केली.
बीड जिल्ह्यातील लोकांच्या मनात आधी हिंमत नव्हती .आता हिम्मत आली .एक एक प्रकरण बाहेर येतील. हे सगळे जण पुण्यात कसे सापडले हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे, असेही सोनवणे म्हणाले.
दरम्यान, वाल्मीक कराड यांच्यावर खोटे गुन्हे दाखल आहेत असा आरोप करत कराड समर्थकांनी परळी बंदचे आयोजन केले होते.
संतोष देशमुख यांच्या खुनात माझ्या नवऱ्याला अडकवण्याचा डाव आहे , असा आरोप करत वाल्मिक कराडची पत्नी मंजिरी कराड यांनी एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली यांच्या नियुक्तीला आक्षेप घेतला आहे. आष्टीचा जावई येथे आणून बसविला असल्याचा आरोप करत आमदार सुरेश धस यांच्यावरही निशाणा साधला आहे.
एसआयटी प्रमुख बसवराज तेली हे आष्टीचे जावई आहेत. त्यांच्या पत्नी शितल उगले या आयएएस ऑफिसर असून त्या आष्टीच्या राहणाऱ्या आहेत. बसवराज तेली यांच्यासह 8 लोक SIT मध्ये बसवले. त्यांना त्यातून काढा .SIT चे लोक काहीही करून माझ्या नवऱ्याला अडकवू शकतात. उद्या त्यांना बदलले नाही तर रोडवर चक्का जाम करणार आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे.
बीड जिल्ह्यामधील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातही वाल्मिक कराड प्रमुख संशयित आहे.
सीआयडीने खंडणी प्रकरण व संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिकची चौकशी करण्यासाठी त्याची सीआयडी कोठडी मागितली होती. मात्र, न्यायमूर्तींनी न्यायालयीन कोठडी दिली आहे. खंडणी प्रकरणात त्याची अजून १४ दिवस चौकशी केली जाईल.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड प्रमुख आरोपी असल्याचा दावा विरोधी पक्षांमधील नेते व मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केला आहे. वाल्मिक कराड याच्या वयोवृद्ध आईनेही परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.Bajrang Sonwane
Parli Bandh is the work of a handful of people, MP Bajrang Sonwane alleges
महत्वाच्या बातम्या
- शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
- कुणाशी जरी लागेबांधे असले तरी आरोपीला सोडणार नाही, एकनाथ शिंदे यांची ग्वाही
- प्रजासत्ताकदिनी काँग्रेसची ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ रॅली
- सर्वोच्च न्यायालयात निर्णय झाला तर तीन-चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मुख्यमंत्र्यांची माहिती