विशेष प्रतिनिधी
धाराशिव : तीन दिवसांत ८९० कोटींचे ड्रग्स सापडल्याची बातमी आहे. या प्रकरणात कैलास सानप, आंधळे यांना दीड वर्षांपासून अटक केली आहे. त्यांचा धनंजय मुंडे यांच्यासोबत फोटो आहे. हेच ते मेन आका. या पिलावळ कसल्या आहेत?” असा सवाल करत भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी भर सभेत धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला..
संतोष देशमुख हत्याप्रकरणात भाजपा आमदार सुरेश धस यांनी आमदार धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले आहे. धनंजय मुंडेंविरोधात विविध आरोप करत त्यांनी त्यांना आकाची उपमा दिली आहे. अनेक भाषणांत सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचा उल्लेख आका असा करत होते. आज त्यांनी थेट जाहीर सभेतच या आकाचा फोटो दाखवला. ते धाराशिव येथे जनआक्रोश सभेत बोलत होते.
“तीन दिवसांत ८९० कोटींचे ड्रग्स सापडल्याची बातमी आहे. ड्रग्स म्हणजे औषध नाही. असं हातावर टोचतात. मग रात्रभर बांगो बांगो… आता दम मारो दम जुना झाला. बांगो बांगोही जुना झाला. नवीन चित्रपटातील गाणी मला माहीत नाहीत. पण या प्रकरणात कैलास सानप, आंधळे यांना दीड वर्षांपासून अटक केली आहे. त्यांचा धनंजय मुंडे यांचा फोट आहे. हेच ते मेन आका. या पिलावळ कसल्या आहेत?” असा सवाल सुरेश धस यांनी केला.
कुत्र्याचं पिल्लू गेलं तरी आपली वाईट अवस्था होते. पण संतोष देशमुख हे पाण्यासाठी कळवळत होते. पाणी पाजा म्हणत होते. पण त्यांनी पाणी पाजलं नाही, दुसरं काहीतरी पाजलं. धाय मोकलून रडत होता माणूस, त्याचा व्हिडिओ काढला अन् दुसऱ्याला दाखवले. तिकडू आका सांगत होता बहोत मारो.. तुम्ही आमच्या संतोषच्या तोंडात मारून माघारी पाठवायचा होता. केजमधून धिंड काढायची होती, पण यापद्धतीने मारायला नको होतं. तुमच्या मनगटात जोर जास्त झालाय, माज आलाय.
“सात जणांना मकोका लावलाय. दहा लाखांची मदतही केलीय. राहिलेला आठवाही मकोका लावला पाहिजे. ३०२ मध्येही आका आहे. ते म्हणत असतील माझा काही संबंध नाही. पण तेच मुख्य आहेत”, असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली.
He is Main Aaka… Suresh Dhas takes direct aim at Dhananjay Munde
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली