विशेष प्रतिनिधी
लेह : Sonam Wangchuk लडाखला ऑगस्ट २०१९ मध्ये केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्यानंतर सोनम वांगचुक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात जोडून आभार मानले होते. मात्र आता हेच वांगचुक लोकांना हिंसा करण्यास, दगडफेक करण्यास उद्युक्त करत आहेत. शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या लडाखमध्ये सध्या असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. २४ सप्टेंबर रोजी झालेल्या आंदोलनात दगडफेक, आगीचे प्रकार घडले आणि चार जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले.Sonam Wangchuk
समोर आलेल्या व्हिडिओ आणि छायाचित्रांमध्ये काँग्रेसच्या एका नगरसेवकाला शस्त्र हातात घेऊन नागरिकांना भडकावताना पाहिले गेले आहे. भाजपच्या कार्यालयांना, सुरक्षा दलांच्या वाहनांना आग लावण्यात आली. विविध ठिकाणी दगडफेक झाली. या हिंसाचारामुळे लडाखमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून काँग्रेसच्या नेत्यांचा हिंसाचाराला उत्तेजन दिल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.Sonam Wangchuk
सोनम वांगचुक उपोषणाच्या माध्यमातून राज्याच्या दर्जासाठी मागणी करत होते. मात्र या काळात केंद्र सरकारशी झालेल्या चर्चेला गुप्त ठेवून लोकांना रस्त्यावर उतरवून हिंसाचारासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आंदोलनाच्या काळात ते स्वतः आपल्या गावात परत गेले होते, ही बाबही चर्चेचा विषय ठरत आहे.
५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र सरकारने कलम ३७० रद्द करून जम्मू-काश्मीरला आणि लडाखला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. त्या वेळी वांगचुक यांनी खुलेपणाने मोदी सरकारचे आभार मानले होते. “लडाखचा ३० वर्षांपासूनचा स्वप्न आज पूर्ण झाले,” असे म्हणत त्यांनी आनंद व्यक्त केला होता. त्यांनी स्वतः अनजुमन मोईन-उल-इस्लाम संस्थेचे पत्र सोशल मीडियावर शेअर केले होते, ज्यात पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि केंद्र सरकारचे आभार मानले होते.
वांगचुक यांनी लडाखसाठी केंद्रशासित प्रदेशाचा आनंदोत्सव साजरा केला होता, तेच आता काँग्रेसच्या पाठबळावर हिंसाचार घडवून आणत असल्याचा आरोप होत आहे. लडाखच्या भविष्यासाठी ही परिस्थिती चिंताजनक ठरत असून या आंदोलना मागील राजकीय हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
Congress and Sonam Wangchuk’s collusion for violence in Ladakh!
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar पुणेकरांनी अडवली शरद पवारांची कार! आमची घरं वाचवा अशी केली मागणी
- भाजप पदाधिकाऱ्यांनी काँग्रसेच्या जेष्ठ पदाधिकार्याला घेरून जबरदस्तीने नेसविली साडी
- Supriya Sule : महाविकास आघाडीत बिघाडी ! सुप्रिया सुळे यांचे स्थानिक स्वराज्य संस्थांत वेगळे लढण्याचे संकेत
- भारतीय प्रेरणांनी लिहिणारे कालजयी साहित्यिक एस एल भैरप्पा यांचे निधन