Rahul Gandhi : सर्वोच्च न्यायालयाची राहुल गांधींना सक्त ताकीद, पुन्हा सावरकरांवर अपशब्द वापरल्यास स्वतःहून कारवाई करू!
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने सक्त ताकीद दिली आहे. अशा वक्तव्यांची पुनरावृत्ती झाल्यास कोर्ट स्वतःहून (सुओ मोटो) कारवाई करेल, असा स्पष्ट इशारा दिला आहे.