विशेष प्रतिनिधी
मुंबई : Rohit Pawar राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या विरोधात डोनाल्ड ट्रम्प यांचे बनावट आधारकार्ड तयार केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दक्षिण मुंबई सायबर पोलीस ठाण्यात धनंजय वागस्कर यांच्या तक्रारीवरून नोंदवण्यात आला असून, या प्रकरणामुळे रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत “बनावट आधारकार्ड कसे तयार केले जाऊ शकते” याचे डेमो प्रात्यक्षिक सादर केले होते. त्यांनी सांगितले होते की, फेक आयडी कसे तयार केले जातात, त्याचे पुरावे कसे निर्माण आणि मिटवले जातात हे त्यांनी दाखवून दिले. मात्र, या प्रात्यक्षिकात त्यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने बनावट आधारकार्ड तयार करून दाखवल्याने आता हे प्रकरण त्यांच्याच विरोधात गुन्ह्यात रूपांतरित झाले आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले, “मी पत्रकार परिषदेत फक्त बोगस मतदार नोंदणीसाठी बनावट आधारकार्ड कसे तयार केले जातात, हे दाखवले. त्यानंतर गृहविभागाने चौकशी केली आणि ते कार्ड खोटे असल्याचेच सिद्ध झाले. मग चौकशीसाठी १५ दिवस का घालवले? गृहविभागाकडे एवढा रिकामा वेळ आहे का? जर आहेच, तर डॉ. संपदा मुंडे, सोमनाथ सूर्यवंशी, महादेव मुंडे, संतोष देशमुख किंवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रकरणांसारख्या गंभीर विषयांवर चौकशी का पुढे सरकत नाही?”
http://youtube.com/post/UgkxAoVNQyZW04Lb9YEoh7Cf7vJdOl1rQq90?si=19WQFWK6OOkehtZt
पवार यांनी गृह विभागाच्या वेळेच्या वाया जाणाऱ्या चौकशीवर टीका केली असून, “मीच जर दाखवले की कार्ड बनावट आहे, तर त्याची चौकशी करणे म्हणजे हास्यास्पद आहे”, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, गृहविभागाने रिकामटेकडेपणा सोडून खरी कामे करावीत असा सल्ला त्यांनी दिला.
Donald Trump’s fake Aadhaar card will be used against MLA Rohit Pawar; Case registered at Cyber Police Station
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















