विशेष प्रतिनिधी
मुंबई :Karuna Munde नाशिकमधील अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले असताना करुणा मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. चाकणकर यांना तात्काळ पदावरून दूर न केल्यास मंत्रालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.Karuna Munde
करुणा मुंडे यांनी चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले की, अशा संवेदनशील पदावर असलेल्या व्यक्तीने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. “गंभीर गुन्ह्यांशी संबंधित व्यक्तींशी संबंध ठेवणे आणि त्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे हे योग्य नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.Karuna Munde
आंदोलनाचा इशारा
मुंडे यांनी सांगितले की, जर सरकारने तातडीने कारवाई केली नाही, तर त्या थेट रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील. मंत्रालयासमोर उपोषण करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.Karuna Munde
या प्रकरणामुळे राज्यातील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. संबंधित प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून, संजय राऊत यांनीही टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्याच नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी नैतिकतेच्या आधारावर रूपाली चाकणकर यांनी तात्काळ पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे. पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, चाकणकर पदावर कायम राहिल्यास पोलिस तपासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्याशी संबंधित गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर चौकशी निष्पक्ष आणि प्रभावी होणे गरजेचे आहे. मात्र, सत्तास्थानी असलेल्या व्यक्तीमुळे तपासात हस्तक्षेप होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले. चाकणकर त्यांची छत्री पकडतात, त्यांचे पाय धुतात, असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, अशोक खरात प्रकरणात समोर आलेल्या धक्कादायक बाबींमुळे आधीच राज्यभर खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या हाती लागलेल्या पेन ड्राइव्हमध्ये अनेक व्हिडिओ आढळल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारवर दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे.
Karuna Munde Aggressive Over Rupali Chakankar’s Resignation, Warns Hunger Strike Outside Mantralaya
महत्वाच्या बातम्या
- उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर; अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा
- भाजपचे मिशन तमिळनाडू, सुपरस्टार विजय यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर!
- Ambadas Danve ठोकून काढू, कापून टाकू’ म्हणत अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी
- कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ, मुख्यमंत्र्यांचा विश्वास