Chandrakant Patil : भोंदू अशोक खरात भेटीवरून अमोल बालवडकर यांचा चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा

विशेष प्रतिनिधी

पुणे: Chandrakant Patil  नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर नगरसेवक अमोल बालवडकर यांनी निशाणा साधला आहे. खरात आणि चंद्रकांत पाटील यांचा फोटो बालवडकर यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.Chandrakant Patil

अमोल बालवडकर यांनी सोशल मेंदूवर पोस्टच्या माध्यमातून पाटील यांना थेट सवाल करत या प्रकरणात स्पष्ट भूमिका मांडण्याची मागणी केली आहे.Chandrakant Patil

बालवडकर यांनी म्हटले आहे की, “भोंदू खरातसोबत संबंधित काही व्हिडीओ आणि फोटो समोर आल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. उच्च शिक्षणासारखी महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे मंत्री अशा व्यक्तीसमोर का झुकले, याबाबत जनतेमध्ये संभ्रम आहे.” जर संबंधित व्यक्तीने कोणाचाही गैरफायदा घेतला असेल, तर कोणत्याही दबावाला बळी न पडता त्याविरोधात तक्रार केली पाहिजे. “कोल्हापूरच्या पुरोगामी परंपरेतून आलेले आणि पुण्यासारख्या प्रबोधनाच्या भूमीत कार्यरत असलेले नेतृत्व अशा प्रकरणांमध्ये स्पष्ट आणि ठाम भूमिका घेईल, अशी अपेक्षा आहे.Chandrakant Patil



बालवडकर यांनी उच्च तंत्र की उच्च तंत्र मंत्र! असे म्हणत बोगस भविष्यवाणी इथेच शिकलात का दादा! असा प्रश्न करत म्हटले आहे की, आदरणीय नामदार चंद्रकांत दादा मला आशा आहे आपल्या साध्या भोळ्या स्वभावाचा संबधित नराधम खरात याने गैरफायदा घेतला नसेल !जरी घेतला असेल तरी सदरील व्यक्तीची आपण कोणत्याही दबावात न येता रीतसर तक्रार करावी.आपण कोल्हापूरचे असलात तरी पुणेकर विशेषतः कोथरुडकर आपल्या कायम सोबत आहेत.

छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी कोल्हापूरचा वारसा सांगत फुले-रानडे-आगरकर या थोर समाजसुधारकांच्या पुण्यात आपण आलात. संतांनी प्रबोधन केलेल्या या महापुरुषांच्या महाराष्ट्रात उच्चशिक्षणासारखी गंभीर

जबाबदारी असणारे चंद्रकांत पाटील हे मंत्री या भोंदू बाबासमोर इतके लीनदीन होऊन का बसले असतील, सदरील नराधम हा जप करून कोणत्या प्रकारच्या मंत्राचा आपल्यावर प्रयोग करत आहे हा प्रश्न कोथरूडच्या अत्यंत सुसंस्कृत आणि सुशिक्षित मतदारांना पडला आहे. कदाचित या मंत्राच्या प्रभावामुळे

आपण कोथरुड येथील नागरिकांच्या समस्या सोडवू शकले नाही.. खरातसारख्या नालायक माणसासमोर मान तुकवणारा माणूस कोथरूडचा प्रतिनिधी कसा असू शकतो, ही चिंता कोथरुडकरांना पोखरून काढते आहे. कुठले आकडे जुळवायला आणि कसले भविष्य जाणून घ्यायला आपले चंद्रकांत दादा भोंदु खरातच्या नादी लागले, याचा खुलासा मायबाप कोथरूडकर जनतेसमोर तुम्ही केला पाहिजे, असे बालवडकर यांनी म्हटले आहे.

“Amol Balwadkar Targets Chandrakant Patil Over Meeting with Fake Godman Ashok Kharat

महत्वाच्या बातम्या