विशेष प्रतिनिधी
पुणे : शहरातील कृषी महाविद्यालय, पुणे येथे १४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण विद्यार्थीवर्ग हादरला आहे. कृषी व्यवसाय व्यवस्थापन (एबीएम) प्रथम वर्षात शिकणारा विद्यार्थी चैतन्य कुंडलिक चव्हाण याचा ‘विद्यार्थी सहकारी भोजनालय’ परिसरात विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. Pune Agricultural College
ही घटना घडल्यानंतर महाविद्यालयाच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना तीव्र झाली आहे.
- तालिका सभापती परिस्थिती बघून निर्देश देऊ शकतात, पण ते ब्रह्मवाक्य नाही, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट
प्राथमिक माहितीनुसार, भोजनालयातील विद्युत यंत्रणा व वायरिंगमध्ये काही त्रुटी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या त्रुटींमुळेच चैतन्यला विजेचा धक्का बसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेनंतर तातडीने सहविद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने संपूर्ण महाविद्यालयात शोककळा पसरली असून, विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी एकत्र येत शांततापूर्ण मार्गाने आपले निवेदन मांडण्याचा निर्णय घेतला आहे. चैतन्य चव्हाण याला न्याय मिळावा, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
Unfortunate incident at Pune Agricultural College: Student dies due to electric shock
महत्वाच्या बातम्या