विशेष प्रतिनिधी
पुणे : शहरात पावसाळी परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पूर नियंत्रण अभियानाअंतर्गत पुणे महानगरपालिकेला 280 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता.त्यापैकी 125 कोटी रुपये निधी हा फक्त पाणी साचणाऱ्या परिसरात निचरा व्यवस्था सुधारण्यासाठी देण्यात आले होते.मात्र,एवढ्या निधी देऊनही काल झालेल्या पावसाने पुणे शहरात विविध ठिकाणी पाणी साठल्याने शहराची दाणादाण उडाल्यामुळे,केंद्र सरकारकडून मिळालेला निधीच्या खर्चावर प्रश्न उपस्थित होत आहे. PMC
मिळालेल्या माहितीनुसार,या निधीपैकी सुमारे 70 टक्के खर्च प्रशासनाकडून झालाच करण्यातच सांगितले जात आहे,तसेच करण्यात आलेले काम आणि कामाची गुणवत्ता दिसून येत नाही.सोबतच मागील 4 वर्षांत पावसाळी गटारे आणि ड्रेनेज लाइन साफसफाई वर जवळपास 60 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.मात्र एवढा खर्च करूनही काल दुपारनंतर झालेल्या पावसाने शहरातील मुख्य चौक,रस्ते आणि नागरी वस्तीत पाणी साचण्याचा घटना घटना कायम असल्याचे पाहायला मिळाले.
महत्वाची बाब म्हणजे,NDMA कडून मिळालेल्या 125 कोटी रुपयांपैकी जवळपास 80 टक्के बिलांची उचल करण्यात आली आहे.म्हणजे निधी खर्च झालेला दाखवला असला तरी प्रत्यक्षात पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात महापालिका अपयशी ठरली आहे.यामुळे प्राप्त महापालिकेने ‘ पाण्यात घातला ‘ असल्याची टीका होत आहे.संबंधित कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे.
40 ते 50 टक्क्याने कमी दराने टेंडर
यावर्षी पावसाळी गटारांच्या साफसफाईच्या निविदांमध्ये 40 ते 50 टक्क्याने कमी दराने टेंडर येत असल्याचे देखील समोर आले आहे.पूर्वीच्या कामाचे दर जास्त दाखवण्यात आले होते का?असा प्रश्न आता पुणेकरांकडून विचारला जातोय.
पावसाळी पूर परिस्थितीवर एकीकडे कोट्यावधींचा निधी खर्च केल्याचे सांगितले जात असताना,प्रत्यक्षात मात्र पुणे शहराची पावसाळी परिस्थिती ‘ जैसे थे ‘ पाहायला मिळत आहे.
Funds worth crores for flood control in PMC
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर