Uday Samant : धार्मिक श्रद्धेपोटी अशोक खरातला फोन पण आता एकनाथ शिंदेंचे गय करू नये असे आदेश, उदय सामंत यांची माहिती

विशेष प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड: Uday Samant  धार्मिक श्रद्धेपोटी फक्त एकनाथ शिंदेच नव्हे तर राज्य सरकारमधील कित्येक मंत्र्यांनी अशोक खरात यांना फोन केले होत, मात्र लोकांच्या धार्मिक आणि आध्यात्मिक भावनाशी खेळणाऱ्या अशोक खरातची कोणतीच गय करू नये, असे आदेश एकनाथ शिंदे यांनी देखील तपास यंत्रणांना दिले आहेत, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.Uday Samant

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पिंपरी चिंचवड शहरात मावळ लोकसभा क्षेत्राची कार्यकर्ता आढावा बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत मावळ लोकसभा क्षेत्रातील सर्व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची पद तात्पुरती रद्द करण्यात आल्याची माहिती उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.Uday Samant



उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोंदू बाबा अशोक खरात याला जवळपास 17 वेळा मोबाईल कॉल केला होता असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. मात्र अंजली दमानियांनी केलेला दावा हा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी फेटाळून लावला आहे. एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये अनेक चांगली कामे केली असल्याने त्यांचे काही हित शत्रू त्यांच्यावर असे आरोप करत असल्याचे त्यांनी सांगितले.

आखाती देशात सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीमुळे आपल्या देशात मोठ्या प्रमाणात इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. याच्या मोठा हा हॉटेल व्यवसायिकांना बसला आहे मात्र ज्या ठिकाणी हॉटेलच्या समोरून एमजीएलच्या गॅस पाईपलाईन जातात अशा सर्व हॉटेल व्यावसायिकांनी मागणी केल्यास त्यांना पीएनजी गॅस पाईप लाईन चा पुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे लवकरच हॉटेल व्यवसायिकांना दिलासा मिळेल असे उदय सामंत यांनी सांगितले.

इंद्रायणी नदी पाठोपाठ आता पिंपरी चिंचवड शहरातून वाहणारी पवना नदी देखील रसायन आणि सांडपाण्यामुळे फेसाळत आहे मात्र इंद्रायणी आणि पवना नदीचा डीपीआरला राज्य सरकारने मंजुरी दिली असून लवकरच पवना आणि इंद्रायणी नदी प्रदूषणाचा मुद्दा मार्गी लागेल असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.

Spoke to Ashok Kharat Out of Faith, But No Leniency Now on Eknath Shinde’s Orders: Uday Samant

महत्वाच्या बातम्या