विशेष प्रतिनिधी
पुणे: पीएमपीएमएल ला अधिक अचूक आणि वेगवान करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने महत्वाचा निर्णय घेतला आहे.बसचे वेळापत्रक आणि संचलन आता डिजिटल स्वरूपात करण्यात येणार येणार आहे.यासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन स्वतंत्र सॉफ्टवेअरचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे.पुढच्या दोन आठवड्यात ही नवीन यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याची माहिती पुणे परिवहन महामंडळ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. PMPL
सध्या पुणे परिवहन महामंडळाकडून बसचे नियोजन आणि आणि वेळापत्रकासाठी वेगवेगळ्या प्रणाली वापरल्या जातात.त्यामुळे एकाच मार्गावर जास्त बस धावणे व रिकाम्या बस रोडवर चालवण्याचे आणि प्रवाशांना अधिक वेळ वाट पाहावी लागते.या सर्व समस्यावर मत करण्यासाठी ‘ इंटिग्रेटेड ‘ सॉफ्टवेअर प्रणाली वापरण्यात येणार आहे.
नवीन प्रणालीत ‘ एव्हेक्स ‘ आणि ‘ कार्गोफ्लो ‘ हे दोन सॉफ्टवेअर एकत्र करण्यात येणार आहेत.या सॉफ्टवेअरमुळे बसचे वेळापत्रक आणि संचालन एकाच प्लॅटफॉर्म वरून नियंत्रित करण्यात येणार आहे.
यात ‘ जीआयएस ‘ तंत्रज्ञानाचा वापर देखील करण्यात येणार आहे.त्यातून गुगल मॅपच्या मदतीने बसचा मार्ग आणि वाहतुकीची परिस्थिती एका क्लिकवर समजणार आहे.
या डिजिटल प्लॅटफॉरमुळे वाहतूक कोंडीचा अंदाज घेऊन बसचे वेळापत्रकर आखण्यात येणार आहे.तसेच ज्या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद कमी आहे त्या मार्गावरील फेऱ्यांमध्ये महत्वाचे बदल करता येणार आहेत.त्यामुळे पी एम पी एल ची सेवा अधिक उत्तम होणार आहे.
पुणे परिवहन प्रशासनाच्या मते,या उपक्रमामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महत्वाचा बदल होईल.
PMPML integrates two software; PMPML will go “digital”!
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तर