Sushma Andhare : दमानियांना एसआयटी प्रमुख करा, सुषमा अंधारे यांचा टोला

विशेष प्रतिनिधी

पुणे : Sushma Andhare एका खासगी व्यक्तीला गोपनीय कॉल रेकॉर्ड्स कसे मिळू शकतात? हा ‘ब्रीच ऑफ प्रायव्हसी’चा (गोपनीयतेचा भंग) गंभीर प्रकार असून, दमानियांचीच चौकशी झाली पाहिजे. एसआयटीपेक्षा दमानियांचा तपास भारी आहे, त्यांनाच प्रमुख करा” असा टोला शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लगावला.Sushma Andhare

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जाहीर केलेल्या कॉल रेकॉर्ड्सवरून (CDR) आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ”
सुषमा अंधारे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत अशोक खरात प्रकरणातील अनेक धक्कादायक पैलू मांडले आणि थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्र्यांवर निशाणा साधला
एकनाथ शिंदे यांच्यावर एसआयटी कारवाई करणार आहे का? एसआयटी चांगले काम करेल अशी अपेक्षा आहे, असा सवाल करत सुषमा अंधारे म्हणाल्या, एखादी माहिती अंजली दमानिया आणि माझ्यापर्यंत पोहोचते, पण तीच माहिती एसआयटीपर्यंत का पोहोचत नाही असा प्रश्न पडतोय. एसआयटीपेक्षा दमानियांचा तपास भारी आहे, त्यामुळे त्यांनाच एसआयटीचे प्रमुख करा.Sushma Andhare



अंजली दमानिया यांनी अशोक खरात, रुपाली चाकणकर आणि इतर नेत्यांमधील संभाषणाचे तपशील एआय (AI) अॅपच्या माध्यमातून मिळवल्याचा दावा केला होता. यावर आक्षेप घेत सुषमा अंधारे म्हणाल्या की, “दमानियांच्या दाव्यानुसार, चाकणकर यांनी खरातला १७७ वेळा, तर त्यांच्या बहिणीने २३६ वेळा फोन केले. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १६ वेळा तर दीपक केसरकर यांनीही खरातशी संवाद साधला. हे सर्व गोपनीय तपशील दमानियांकडे आले कुठून? त्यांना हे रेकॉर्ड्स कुणी पुरवले? जर एखादी खासगी व्यक्ती इतक्या सहजपणे कुणाचेही सीडीआर काढू शकत असेल, तर हा सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे.” यावेळी त्यांनी उपरोधिक टोला लगावत, ”

ज्यांनी सीडीआर काढले त्यांच्यावर कारवाई करावीच, पण ज्यांचे सीडीआरमध्ये नाव निघाले त्यांच्यावर काय कारवाई करणार? या सीडीआर प्रकरणात एकनाथ शिंदे यांचे नाव आहे. त्यांच्यावर काय कारवाई करणार? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला. सातारा ड्रग्जच्या प्रकरणात आम्ही अनेक आरोप केले, पण त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. राज्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्याच्या महिला आयोगाच्या आधीच्या अध्यक्षा यांनी इतक्या वेळा अशोक खरातला कॉल का केला? याची माहिती समोर आली पाहिजे. या काळात पुरावे नष्ट केले जाऊ शकतात. एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर ही नावे मोठी आहेत, त्यामुळे त्यांची चौकशी का केली जात नाही? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.

“Appoint Damania as SIT Chief”: Sushma Andhare Takes a Swipe

महत्वाच्या बातम्या