पुण्यात नफ्याचे लालसेने डॉक्टर झाला कंगाल!७५ वर्षीय डॉक्टरची १२.३१ कोटी रुपयांची ऑनलाईन फसवणूक..

विशेष प्रतिनिधी

पुणे:शहरात ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.आयुष्भर रुग्णांची सेवा करून जमवलेली जमापुंजी एक ७५ वर्षीय डॉक्टरने काही दिवसात गमावली आहे.शेअर ट्रेडिंगमधून ‘ गारंटीड प्रॉफिट ‘ मिळवून देण्याचे आमिष पीडित डॉक्टरल सायबर गुन्हेगारांकडून दाखवण्यात आले.आणि तब्बल १२.३१ कोटी रुपयांचा गंडा घातला आहे.

जानेवारी महिन्याचा शेवटच्या आठवड्यात पीडित डॉक्टरल एक अनोळखी मेसेज आला. डॉक्टर नायिका अनोळखी मोबाईल क्रमांक वरून शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचा दावा करणारा तो मेसेज होता. अनोळखी क्रमांकावरून आलेल्या त्या मेसेजमध्ये ‘ हॉट स्टॉक्स ‘ ची यादी आणि एक लिंक देण्यात आली होती.



पीडित डॉक्टरने लिंक वर क्लिक करताच त्यांना एका व्हॉट्स ऍप ग्रूप मध्ये जोडण्यात आले,त्या ग्रूपमध्ये स्वतःला आंतरराष्ट्रीय वित्तीय कंपनीचे वरिष्ठ अधिकारी सांगणारे अनेकजण सक्रिय होते.

डॉक्टरांना जोडण्यात आलेल्या ग्रुपमध्ये दररोज मोठ्या मोठ्या नफ्याचे स्क्रीनशॉट,मोठ्या गुंतवणूकदारांच्या यशोगाथा आणि महत्वाचे आकर्षक सल्ले दिले जात होते.या सर्व गोष्टींमुळे डॉक्टरांनी हळू हळू त्या लोकांवर विश्वास ठेवला.

त्यानंतर पीडित डॉक्टरल बनावट ट्रेडिंग ॲपवर नेण्यात आले.पुढच्या काही दिवसात डॉक्टरांनी स्वतःची वैयक्तीक आणि आर्थिक माहिती दिली आणि विविध बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्स्फर करण्यास सुरुवात केली.

७ मार्च ते १८ मार्च दरम्यान अवघ्या ८ दिवसांच्या कालावधीत त्यांनी ८ वेळा व्यवहार केला आणि तब्बल १२.३१ कोटी रुपये गुंतवले.बनावट अँप मधून त्यांना ५४ कोटी रुपयांचा नफा होणार आहे,असे सांगण्यात आल्याने त्याचं विश्वास अधिकच वाढत गेलं.

मात्र जेव्हा गुंतवलेले पैसे काढण्याचा निर्णय घेतला,तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांचा लक्षात आले.”अजून पैसे जमा करा, नाहीतर तुमची मालमत्ता जप्त केली जाईल”,अशा धमक्या देत आरोपी त्याच्यावर दबाव टाकत होते.

फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुण्यातील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांकडून सध्या संबंधित बँक खात्यांची तपासणी करत असून,आरोपींचा शोध घेतला जात आहे.

A doctor in Pune became poor due to greed for profit! 75-year-old doctor was cheated of Rs 12.31 crore online..