विशेष प्रतिनिधी
पुणे:मराठवाड्यातील परभणी,नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांना शनिवारी सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.शनिवारी सकाळी ८.४५ आणि ८.४६ च्या सुमारास भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवले.हिंगोली जिल्ह्यातील औंढा,वसमत आणि कळमनुरी तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांनी घराचा बाहेर धाव घेतली.पुढच्या काही थोड्यावेळात परभणी शहर आणि आणि जिल्ह्याचा काही भागात जमिनीत हालचाल जाणवून कंप पावल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.एकाचवेळी तीन जिल्ह्यांना धक्के जाणवले हिंगोली जिल्ह्याला ८.४५ वाजता पहिला धक्का जाणवला तर,८.४६ मिनिटाला परभणी आणि नांदेड जिल्ह्यात धक्के जाणवले.ग्रामीण भागात घरावरील पत्रे आणि भांडी वाजू लागल्याने नागरिकांना भूकंपाचे धक्के बसल्याची खात्री झाली.
प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार,धक्के सौम्य असल्याने कुठेही जीवित हानी झाली नाही.नागरिकांनी घाबरून जाऊ नये व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
‘ किल्लारी ‘ भूकंपानंतर मराठवाडा हादरलेलाच
३० सप्टेंबर १९९३ मध्ये लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे ६.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप झाला होता.गणेशोत्सवाच्या काळात सकाळी ६.४५ वाजता तीव्र भूकंपाने लातूर जिल्हा आणि किल्लारी गावावर भीषण परिस्थिती ओढवली होती.अगदी पहाटे झालेल्या ह्या भीषण भूकंपात किल्लारी आणि आसपासच्या गावातील तब्बल १०,००० हजार नागरिकांचा मृत्यू झाला होता. किल्लारी भूकंपाच्या ३३ वर्षानंतर देखील मराठवाड्यातील जिल्ह्यांना अनेकवेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.१९९३ ते २०२६ या काळात मराठवाड्याला १२५ पेक्षा अधिक वेळ भूकंपाचे तीव्र आणि सौम्य धक्के जाणवले आहेत.
मराठवाड्याला भूकंपाचे वारंवार धक्के जाणवण्याचे कारण काय?
१९९३ च्या किल्लारी भूकंपानंतर मराठवाड्यातील विशेषतः परभणी,धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांना वारंवार भूकंपाचे सौम्य धक्के जाणवतात.याचे मुख्य कारण म्हणजे या भागातील भूगर्भातील सक्रीय फॉल्ट लाईन्स मी टेक्टॉनिक प्लेट मधील वारंवार होणाऱ्या हालचाली,हा भाग स्थिर असला तरी भूगर्भातील तणाव जेव्हा मुक्त होतो तेव्हा भूकंपाचे सौम्य धक्के लातूर आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना जाणवतात.