पुणे काँग्रेसमध्ये राजकीय घमासान;अध्यक्षपदावरून शिंदे आणि जगताप यांच्यात जुंपली!

विशेष प्रतिनिधी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काँग्रेसमध्ये प्रवेश करताना शहराध्यक्ष पदाचा शब्द देण्यात आल्याची चर्चा असलेले प्रशांत जगता सध्या पुण्यातील राजकीय घडामोडींमध्ये पुन्हा चर्चेत आले आहेत. मात्र, शहराध्यक्ष पदाबाबत सध्या सुरू असलेल्या अनिश्चिततेमुळे त्यांच्या पुढील भूमिकेबाबत उत्सुकता वाढली आहे.

काँग्रेसमध्ये प्रवेश करताना प्रशांत जगताप यांना पुणे शहराध्यक्ष पद देण्याचे आश्वासन मिळाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. त्यानंतर काही काळ त्यांनी संघटनात्मक पातळीवर सक्रिय भूमिका घेतली आणि कार्यकर्त्यांशी संवादही वाढवला. मात्र, आता पुणे शहर काँग्रेसमध्ये दोन शहराध्यक्ष नेमण्याच्या चर्चेमुळे नवीन राजकीय समीकरणे समोर येत आहेत.
या पार्श्वभूमीवर प्रशांत जगताप यांनी सार्वजनिक स्तरावर कोणतीही तीव्र प्रतिक्रिया दिलेली नसली, तरी ते संघटनात्मक बैठका, कार्यकर्त्यांशी संपर्क आणि पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी थेट नाराजी व्यक्त करण्याऐवजी “वेट अँड वॉच” भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.


 


अरविंद शिंदेंची प्रशांत जगतापांवर कुरघोडी

प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधून काँग्रेस मध्ये प्रवेश घेतल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते.प्रशांत जगताप यांना शहर अध्यक्ष पदाचा शब्द देण्यात आल्याचा चर्चा देखील ऐकायला मिळत होत्या,मात्र जगतापांच्या प्रवेशाने विद्यमान अध्यक्ष अरविंद शिंदे नाराज असल्याचे बोलेल जात होते.शहर अध्यक्ष पद आपल्याच गटात राहावे यासाठी शिंदेंकडून लॉबिंग झाल्याचा चर्चा रंगल्या होत्या.

दुसरीकडे काँग्रेसमधील अंतर्गत कलह आणि नेत्यांमधील समतोल राखण्यासाठी दोन शहर अध्यक्ष नेमण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे काँग्रेसच्या वरिष्ठांकडून सांगण्यात येत आहे.

Political tussle in Pune Congress; Shinde and Jagtap clash over the post of president!