Sheetal Tejwani : शीतल तेजवानीला उच्च न्यायालयाचा जामीन मंजूर, अटक आणि रिमांड प्रक्रियेत गंभीर त्रुटी असल्याचे निरीक्षण

विशेष प्रतिनिधी

पुणे : Sheetal Tejwani  पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या शीतल तेजवानीला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तिची अटक आणि रिमांड प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळल्याचे न्यायालल्याने म्हटले आहे. बावधन पोलिसांच्या कामकाजातील हलगर्जीपणाचा फायदा तेजवानीला झाल्याची चर्चा असल्याने पोलिसांच्या तपास पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.Sheetal Tejwani

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांनी अटकेपूर्वी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करताना अनेक चुका केल्याचे समोर आले आहे. पुणे पोलिसांनी ताब्यात घेताना अटकेचे स्पष्ट कारण दिले नाही, पिंपरी येथील सेवा विकास बँक प्रकरणात अटकेपूर्वी दोन तास आधी माहिती देण्याचा नियमही पाळला गेला नाही. या त्रुटींवर न्यायालयाने ताशेरे ओढत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. यामुळे अटक आणि त्यानंतरचे सर्व रिमांड आदेश बेकायदेशीर ठरवण्यात आले.Sheetal Tejwani



न्यायालयाच्या आदेशानुसार, 16 डिसेंबर 2025 रोजी बावधन पोलीस ठाण्यातील झालेली अटक आणि त्यानंतरचे रिमांड आदेश अवैध घोषित करण्यात आले. याचबरोबर पुढील सर्व ताबा आदेशही रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे शीतल तेजवानीला तत्काळ मुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या जामिनासोबत न्यायालयाने काही कठोर अटीही घातल्या आहेत. आरोपीने कोणत्याही पुराव्याशी छेडछाड करायची नाही, साक्षीदारांना धमकी किंवा प्रलोभन द्यायचे नाही, तसेच तपास अधिकाऱ्यासमोर गरजेनुसार हजर राहणे बंधनकारक आहे. याशिवाय, न्यायालयात नियमित हजेरी लावण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. या अटींचे उल्लंघन झाल्यास जामीन रद्द होऊ शकतो, असा इशाराही न्यायालयाने दिला आहे.

दरम्यान, दुसऱ्या एका आदेशात 3 जानेवारी 2026 रोजी पिंपरी पोलिस ठाण्यातील CR No. 806/2019 अंतर्गत झालेली अटक आणि रिमांड प्रक्रियाही बेकायदेशीर ठरवण्यात आली आहे. या प्रकरणातही न्यायालयाने सर्व रिमांड आदेश रद्द करत आरोपीला जामिनावर सोडण्याचे निर्देश दिले आहेत.

High court grants bail to Sheetal Tejwani, flags lapses in arrest and remand process

महत्वाच्या बातम्या