राज्यात पुन्हा प्रशासकीय बदल्या; पुणे विभागीय आयुक्तपदी शीतल तेली-उगले यांची नियुक्ती

विशेष प्रतिनिधी

मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू असून, त्याचाच भाग म्हणून राज्य सरकारने पुन्हा एकदा महत्त्वाच्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली विशेष चर्चेत आहे. त्यांच्या जागी आता शीतल तेली-उगले यांची पुणे विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. Sheetal Teli-Ugale

शीतल तेली-उगले या २००९ बॅचच्या आयएएस अधिकारी असून त्या यापूर्वी पुण्यात क्रीडा आणि युवक कल्याण आयुक्त म्हणून कार्यरत होत्या.



२०१२ बॅचचे आयएएस अधिकारी दीपक सिंगला यांची पुण्याच्या क्रीडा आणि युवक कल्याण आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून ते वैद्यकीय रजेवर होते. आता त्यांच्याकडे शीतल तेली-उगले यांनी सांभाळलेला विभाग सोपवण्यात आला आहे.

२०२० बॅचचे आयएएस अधिकारी मुरुगनांथम एम. यांचीही महत्त्वाच्या पदावर बदली करण्यात आली आहे. गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या मुरुगनांथम एम. यांची आता नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर शहरातील नागरी सुविधा, विकास प्रकल्प आणि प्रशासनातील समन्वय यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.

Administrative reshuffle in Maharashtra; Sheetal Teli-Ugale appointed Pune Divisional Commissioner