विशेष प्रतिनिधी
साेलापूर : सर्व खासदारांसाठी कायम ज्यांचा दरवाजा उघडा असणारे नितीन गडकरी यांच्याकडे पक्षीय भेद नसतो. तुमच्यासारख्या नेत्याची महाराष्ट्राला उणीव आहे. आज जर तुम्ही मुख्यमंत्री असता, तर महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता, अशी स्तुतीसुमने काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी उधळली आहेत. Nitin Gadkari
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पालखी मार्गाची पाहणी केली. तसेच सोलापूर दौऱ्यात २,७८४ कोटींच्या ५ राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन केले. या कार्यक्रमाला काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे उपस्थित होत्या. प्रणिती शिंदे म्हणाल्या, आपण हा कार्यक्रम घेतला आणि या कार्यक्रमासाठी मला निमंत्रण पाठवले. आजच्या परिस्थितीत जिथे विरोधकांना वैयक्तिक शत्रू म्हणले जाते, तिथे तुम्ही विरोधकांना सन्मानाची वागणूक देता आणि आमची कामे मार्गी लावता.
महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र राहिला असताहे आमच्यासाठी नवल आहे आणि त्यासाठी तुमचे आभार मानते. तुम्ही मी दिलेल्या पत्रावरती रिमार्क करून कामाला मंजूर दिली, त्यावेळेस मला असे वाटले की, तुमच्यासारख्या नेत्याची महाराष्ट्रात उणीव आहे. जर तुम्ही आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात तर महाराष्ट्राची परंपरा आणखी बळकट झाली असती. आम्हाला आणखी बळ मिळाले असते. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र राहिला असता. महाराष्ट्राच्या विकासाला आणखी बळ मिळाला असते, पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र पुढे गेला असता.
स्मार्ट व्हिलेजसाठी प्रयत्न करत आहे. विकासाचा असमतोल निर्माण झाला आहे, तो होऊ नये. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी रस्ता झाला याचा आनंद आहे. मात्र, हे श्रेय माझे एकट्याच नाही, असंख्य इंजिनियर आणि कंत्राटदार माझ्यासोबत काम करत आहेत. मी केवळ निमित्त मात्र आहे. २२ हजार कोटी खर्च करून बौद्ध सर्किट पूर्ण केले. बोधीवृक्षाखाली थांबलो होतो, त्यावेळी बोधी वृक्षाचे पान आधी माझ्या आणि त्यानंतर बायकोच्या खांद्यावर पडले. त्यावेळी भिक्षु म्हणाले की, गौतम बुद्धचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला, अशी एक आठवण नितीन गडकरी यांनी सांगितली.
If you had become the Chief Minister.. Praniti Shinde’s praise for Nitin Gadkari
महत्वाच्या बातम्या
- १०५ दिवसांत मराठी शिका, अन्यथा १६ ऑगस्टपासून कारवाई; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा
- काँग्रेसने द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसला; तमिळनाडूतील सत्तांतरावर मोदींचा हल्लाबोल
- अशोक खरात प्रकरणात चार मंत्र्यांवर गंभीर आरोप, नाना पटोलेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी
- भोंदू अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांची एसआयटीसमोर चौकशी