निदा खानला आश्रय देणाऱ्या मतीन पटेलच्या घरावर बुलडाेझर, छत्रपती संभाजीनगर महापालिकेची अनधिकृत बांधकामावर कारवाई

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : नाशिक टीसीएस कथित धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित आराेपी निदा खान हिला आश्रय देणारे छत्रपती संभाजीनगरचे एआयएमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांचे घर आणि कार्यालय बुधवारी सकाळी बुलडोझरने पाडण्यात आले.Matin Patel

आरोपी निदा खानला 7 मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली होती. मतीन पटेलने तिला आपल्या घरात आश्रय दिला होता असा दावा करण्यात आला. यानंतर 9 मे रोजी महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस बजावली होती आणि 72 तासांत उत्तर मागितले होते. बुधवारी सकाळी मतीन पटेल यांच्या घर-कार्यालयावर बुलडोझर कारवाई करण्यात आली.



कारवाईदरम्यान मतीन पटेल यांच्या कुटुंबिय महापालिकेचे अधिकारी आणि पथक घटनास्थळी पोहोचताच कुटुंबीय हार घेऊन स्वागतासाठी उभे राहिले होते. घरावर नोटीस लावण्यात आल्यानंतरही उत्तर देण्यात आले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यानंतर नियमांनुसार कारवाई करत घर जमीनदोस्त करण्यात आले. या संपूर्ण घडामोडीमुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती आणि पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

या कारवाईनंतर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मध्यरात्री नारेगाव परिसरात जाऊन नागरिक आणि समर्थकांशी संवाद साधला. त्यांनी उपस्थितांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले. मी शेवटच्या आशेने येथे आलो आहे. पुढच्या वेळी येईन तेव्हा मतीन पटेल माझ्यासोबत असतील, असे वक्तव्य करत त्यांनी कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. तसेच मतीन पटेल यांच्या कुटुंबीयांनी महापालिका पथकाचे स्वागत करण्याचा निर्णय घेतल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

इम्तियाज जलील यांनी एमआयएमला राजकीयदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप केला. पोलिस, सत्ता आणि प्रशासन त्यांच्या हातात आहे. आम्ही न्यायालयात जातो, पण न्यायालयाच्या निर्णयालाही किंमत दिली जात नसेल तर आम्ही न्याय कुठे मागायचा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

इम्तियाज जलील म्हणाले, मतीन हा माझा विश्वासू माणूस आहे. कायदा सर्वांसाठी समान असेल तर त्याची अंमलबजावणीही समान पद्धतीने झाली पाहिजे.

Bulldozer action on Matin Patel’s house for sheltering Nida Khan

महत्वाच्या बातम्या