ओबीसीआरक्षणावर किंवा हक्कांवर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचे ठाम आश्वासन

विशेष प्रतिनिधी

नागपूर : मराठा समाजाला न्याय देत असताना, ओबीसी समाजाच्या आरक्षणावर किंवा हक्कांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, असे ठाम आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मराठा आरक्षणासंदर्भात 2 सप्टेंबर 2025 रोजी सरकारने काढलेल्या जीआरमुळे सध्या ओबीसी समाज आक्रमक झाला आहे.

हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील या जीआरमुळे ओबीसी समाजात आपल्या आरक्षणाला धक्का बसण्याची भीती निर्माण झाली असून, हा जीआर रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात ओबीसी वसतिगृहांची केवळ घोषणा झाली होती, मात्र आम्ही सत्तेत आल्यानंतर 60 नवीन ओबीसी वसतिगृहे सुरू केली. तसेच, 10 लाख ओबीसींना हक्काची घरे दिली आणि समाजासाठी असलेली आर्थिक महामंडळेही मजबूत केली.



देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, आपण महाराष्ट्रात कधीही जाती-पातीमध्ये भेदभाव केला नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील 18 पगड जातींना सोबत घेतले होते. त्यामुळे कोणत्याही समाजावर अन्याय करण्याची सरकारची भूमिका नाही.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळ े म्हणाले, हा आदेश फक्त मराठवाड्यातील चार जिल्ह्यापुरता मर्यादित आहे, असे असताना काँग्रेस नेते यावर राजकारण करत आहेत. विदर्भातील ओबीसी समाजाचे आरक्षण गेले म्हणून म्हणून मोर्चा काढत होते. मात्र,देवेंद्र फडणवीस असेपर्यंत ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. बबनराव तायवाडे पण ते सांगत फिरत आहेत. मात्र काँग्रेस नेते ऐकायला तयार नाहीत. ओबीसींचे खरे कैवारी हे देवेंद्र फडणवीसच आहेत.

CM Assures: No Injustice Will Be Allowed on OBC Reservation or Rights

महत्वाच्या बातम्या